जमीन बळाकावण्याचा प्रयत्न: पुण्यात माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime news| तक्रारदार सुषमा रिठे, त्यांची बहीण निलिमा व आई मुक्ता कांबळे या संबंधित जमीनीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (२४ जून) तेथे गेल्या होत्या.
Pune Crime news|
Pune Crime news|

पुणे : जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पुण्यातील एका माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट यार्डजवळील गंगाधाम परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. मात्र माजी नगरसेवकाने या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी सुमीत तेलंग, शहाजी रणदिवे, सुकेशनी ऊर्फ राणी बनसोडे, बाळा ओसवाल असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Crime news Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुषमा सुनील रिठे यांनी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुषमा रिठे यांचे पती व दिराने गंगाधाम रस्ता परिसरात जमीन खरेदी केली होती. ही जमीन ही सुमीत तेलंग याचे वडील दिलीप तेलंग यांच्या मालकीची होती. पण त्यावरुन त्यांच्यात सातत्याने वाद होते.

Pune Crime news|
वकील विशाल आचार्य यांनी पाठवला झिरवळांना मेल; यावरून सुरू आहे न्यायालयात युक्तीवाद

तक्रारदार सुषमा रिठे, त्यांची बहीण निलिमा व आई मुक्ता कांबळे या संबंधित जमीनीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (२४ जून) तेथे गेल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपी सुमीत तेलंग, रणदिवे, बनसोडे यांनी तक्रारदार सुषमा रिठे त्यांची बहिण निलीमा व आईला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तर सुमीत तेलंग याने आपले डोके घराच्या भिंतीवर आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याचा आरोपही सुषमा रिठे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

याच दरम्यान माजी नगरसेवक बाळा ओसवालही तिथे आले. संबंधित जागा आपण विकत घेतली असून तिथले लोकही आपल्या आहेत, असे सांगत धमकी दिल्याचा आरोप सुषमा रिठे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी आता जमीन बळकावण्याचा प्रयत्न करुन धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी बाळा ओसवाल यांच्यासह चौघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधित प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसून आपण पक्षाच्या बैठकीच्या गडबडीमध्ये होतो, असा दावा ओसवाल यांनी केला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची माहिती मिळावी, असेही ओसवाल यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com