अजित पवारांवर अक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; 15 जणांवर गुन्हा दाखल..

Ajit Pawar|Baramati|NCP: नितीन संजय यादव यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

वडगाव निंबाळकर : राज्याचे उपमुख्यमंकत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भात फेसबुकवर (Facebook) बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी १५ फेसबुक खातेधारकांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Ajit Pawar
राणे लढाई जिंकले! अखेर मुंबई महापालिकेने घेतली माघार

'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट करमुक्त करावा या आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली होती. त्याखाली गुन्हा दाखल झालेल्या खातेधारकांनी पवार यांची बदनामी करणारा, अश्लिल मजकूर टाकला होता. सतीश वर्तक, विश्वजित इंद्रदेव पोटफाडे, विपुल भोंगळे, विनोद पवार, विजय भोगे, रणजित राठोड, सचिनभैय्या तिपटे पाटील, शंतनू घैवट, प्रसन्न निजामपूरकर, ओंकार देवरकगावकर, आशुतोष भिताडे, हरीष शेटे, कुणाल महाडीक, गणेश चोरमारे, अभिजित देशमुख या फेसबुक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. नितीन संजय यादव (रा. करंजेपूल, ता. बारामती) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली होती. १७ मार्च रोजी हा प्रकार उघडकिस आला आहे.

Ajit Pawar
पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती; भाजपचे पाच आमदार निलंबित

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर राजकीय नेत्यांची बदनामी केली जाण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त शिवसैनिक व महिला पदाधिकारी यांनी जळगावात सेंट्रल मॉल परिसरात या तरुणाचा शोध घेऊन त्याला चोप दिल्याची घटना घडली आहे. हेमंत दुधिया असे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या युवकाने ठाकरे यांच्या विरोधात आक्षपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर तो जळगाव येथे खानदेश सेंट्रल येथे चित्रपट पहाण्यास आला असता त्याला शिवसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या तरूणानेही सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो पोस्ट करत या फोटोत शरद पवार, उद्धव ठकारे, इम्तियाज जलील, याच्याबाबत आक्षेपार्ह अशी पोस्ट केली होती. या युककास शिवसैनिकांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com