जमीन NA करण्यासाठी मागितली ४२ लाखांची लाच..तहसीदारांसह पाचजणांवर गुन्हा दाखल तर तलाठी ताब्यात

Crime : अमोल तांबे यांनी ACB च्या अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही सर्वात मोठी कारवाई आहे.
Crime Latest News
Crime Latest NewsSarkarnama

पिंपरी:एका ट्रस्टची जमिन एनए (अकृषक) करून देण्यासाठी तब्बल ४२ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्याबाबत शिरूरच्या (जि.पुणे) तत्कालीन तहसीलदार, त्यांच्या कार्यालयातील महसूल सहाय्यक, तलाठी आणि इतर दोन खासगी इसम अशा पाचजणांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा आज (ता.२८ नोव्हेंबर) पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. (Crime Latest News)

Crime Latest News
‘लव्ह जिहाद’ : 'भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुला-मुलींनींच मुस्लिम धर्मियाबरोबर केलयं लग्न'

अमोल तांबे यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पोलिस अधिक्षक (एसपी) म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यातील पाच आरोपींत मुख्य आरोपी तहसीलदारांसह दोन महिला आहेत. रंजना उमेश उमरहांडे असे त्यांचे नाव आहे. स्वाती सुभाष शिंदे (महसूल सहाय्यक, शिरूर तहसीलदार कार्यालय)सरफराज तुराब देशमुख (तलाठी,शिरूर) आणि खासगी इसम अतुल घाडगे आणि निंबाळकर अशी इतर आरोपींची नावे आहेत.तलाठ्याला एसीबीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या लाचखोरीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचाही संशय एसीबीला आहे.

Crime Latest News
उद्धव ठाकरेंना कुणीतरी चुकीचं ब्रिफिंग करतयं..शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितले...

तब्बल पाच महिन्यांपासून म्हणजे २५ मे पासून पुणे एसीबीच्या या अगोदरच्या एसपींपासून या लाचखोरीच्या प्रकरणाची पडताळणी सुरु होती. त्यातील तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एनए प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तसेच त्याला वरिष्ठ म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूरी आणण्यासाठी तलाठी देशमुख यांनी ४२ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यात शिंदे यांचा एक, तर उमरहांडेंचा पाच लाख रुपयांचा वाटा होता. घाडगे व निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून 'एनए'चा प्रस्ताव मंजूर करून आणण्यासाठी तसेच त्यात मदत करण्यासाठी वीस लाख रुपये मागितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com