पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ! तासाभरानंतर वाहतूक सुरळित

Pune Railway station Bomb news | पुण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन थांबवल्या
Pune Railway station Bomb news
Pune Railway station Bomb news

Pune Railway Station news

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटीनच्या कांडया आढळून आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. स्टेशनमध्ये स्फोटक वस्तू आढळताच नागरिकांना त्या परिसरापासून दूर पाठवण्यात आले. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) आणि बॉम्ब नाशक पथक, डॉग स्कॉड सुद्धा दाखल झाले.

मात्र स्टेशनमध्ये सापडलेल्या वस्तू कोणतेही घातक स्फोटके नसून फक्त फटाक्यासारखे क्रॉकर असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांची तत्परता तपासण्यासाठी हा डेमो आयोजित करण्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, अद्याप वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे शहरात काही काळासाठी एकच खळबळ उडाली होती.

Pune Railway station Bomb news
शिवसेनेची तोफ धडाडणार ! उद्धव ठाकरे जंगी सभा घेणार

खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकातील संपूर्ण रेल्वे स्थानक रिकामं करण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा रेल्वे स्थानकात दाखल झाले असूव. संपूर्ण परिसरात बीडीडीएस (BDDS) पथकाकडून पाहणी सुरू आहे. रेल्वे स्थानकातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर वाहतूक थांबवण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे रेल्वे स्थानकावर धाव घेत पाहणी केली. त्यावेळी बॉम्ब सदृश वस्तू जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in