एक ब्लास्ट अन् चांदणी चौकातील पूल इतिहास जमा

Pune Chandani Chauk Bridge | वाहतुकीला अडथळा ठरणारा पुण्यातील चांदणी चौकातील पूल मध्यरात्री 1 वाजता पाडण्यात आला.
Pune Chandani Chauk Bridge
Pune Chandani Chauk Bridge

पुणे : वाहतुकीला अडथळा ठरणारा पुण्यातील चांदणी चौकातील पूल मध्यरात्री 1 वाजता पाडण्यात आला. हा पूल पाडण्याआधीच काही तास आधी पूलावरील वाहतूक बंद करुन रात्री बारा वाजल्यापासूनच या परिसरात जमावबंदी लागू कऱण्यात आली होती. पुलाला 1300 छिद्र पाडून त्यात 600 किलो स्फोटक भरुन हा स्फोट करण्यात आला. ( Pune Chandani Chauk Bridge)

दरम्यान, या परिसरात फारशा रहिवासी इमारती नसल्या तरी या पूलाचा आजूबाजूला असलेले हॉटेल्स पूर्णत: रिकामे करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची चर्चा संपूर्ण शहरात ऐकायला मिळत होती. अखेर आज मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला. आता पूलाचे उरलेला ढीग हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे.

Pune Chandani Chauk Bridge
Solapur University : युवासेना, काँग्रेसची बाजी; पण क्रॉस वोटिंगमुळे संभाजी ब्रिगेडचा घात

- असा पाडला पूल

कंट्रोल्ड ब्लास्ट पद्धतीचा वापर करुन चांदणी चौकातील हा पूल पाडण्यात आला. स्फोट करणता लोखंडी जाळीच्या आठ लेअर लावण्यात आलेल्या होत्या. तसेच स्फोट झाल्यानंतर धूळ न उडण्यासाठी जाळीच्या पांढऱ्या कापडाचा वापर करण्यात आला होता. पूल पडल्यानंतर दहा मिनिटातच जेसीबीने सहाय्याने पूलाचा ढीग हटवण्याचे काम सुरु झाले.

वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता

पण या स्फोटाच्या दरम्यान संपूर्ण पूल उध्वस्त न झाल्यामुळे उरलेले पूलाचे काम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण पूल उध्वस्त न झाल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने पूल पाडण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे रस्ता रिकामा करण्यासाठीही जास्त वेळ जाऊ शकतो.

पूलाच्या पाडकामानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना या पूलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, अशी तक्रार येथील नागरिकांनी माझ्याकडे केली होती. त्या भागाचा सर्व्हे केल्यानंतर एनएचआय, पीडब्लूडी अधिकाऱ्यांना पूल पाडण्यासंबंधी सूचना केल्या होत्या. अखेर कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीने हा पूल पूल पाडण्यात आला, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com