आरटीओ कार्यालयासमोरच बाईक टॅक्सीचालकाला बेदम मारहाण, रिक्षा चालकांच्या संपाला हिंसक वळण

Auto Rickshaw Strike : पुण्यात बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षा चालक आक्रमक
Pune Auto Rickshaw Strike
Pune Auto Rickshaw StrikeSarkarnama

Auto Rickshaw Strike : पुण्यातील रिक्षा संघटनांनी आज बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आजपासून (दि.28 नोव्हेंबर) बेमुदत संप पुकारला आहे. मात्र रिक्षा संघटनांच्या या संपाला हिंसक वळण लागलं आहे. एका बाईक टॅक्सीचालकाला रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

बघतोय रिक्षावाला संघटनेच्यावतीने आज बाईक टॅक्सीच्या विरोधात परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. बाईक टॅक्सी बंद कराव्यात यासाठी वारंवार विनंती करूनही कारवाई होत नसल्याचं या रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. या संपामध्ये सुमारे ३००० रिक्षाचालक सहभागी झाले असून पुण्यातील १२ संघटनांनी या रिक्षा बंदला पाठींबा दिला आहे.

या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला मात्र काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. आरटीओ (RTO) कार्यालयासमोरच बाईक टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर सिंहगड रोड रस्त्यावर जे रिक्षाचालक या संपामध्ये सहभागी झाले नाहीत त्यांच्या रिक्षा अडवून काचा फोडण्यात आल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. त्यामुळे रिक्षा चालकांचा (Auto Rickshaw) हा संप चिघळण्याची शक्यता आहे.

Pune Auto Rickshaw Strike
नाशिक अनाथाश्रमातील मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी मंत्री लोढांनी सचिवांना दिला सात दिवसांचा अल्टिमेटम

रिक्षा चालकांनी का केला संप?

बाईक टॅक्सीमुळे (Bike taxi) रिक्षावाल्याचा जवळपास ९० टक्के व्यवसाय बुडत असल्याचा दावा या रिक्षा चालकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बाईक टॅक्सीच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. आम्ही ओला उबेर आणि रॅपिडो या कंपन्यांच्या बाईक टॅक्सी बंद झाल्याशिवाय हा संप मागे घेणार नाहीत, असा इशारा बघतोय रिक्षावाला संघटनेने दिला आहे.

रिक्षा चालकांच्या संपामुळे पुणेकरांचे हाल?

पुण्यात बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. आजपासून रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे पुण्यातील विद्यार्थी आणि पुणेकरांचे हाल होत असल्याचे समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com