
Teachers recruitment scam | कर्वे रस्त्यावर असलेल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी आता थेट न्यायालयाच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे. (Abasaheb Garware recruitment scam
शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातलेले असताना बॅक डेटेड नियुक्त्या दाखवून कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची भरती करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांसह कॉलेजमधील प्राचार्य ,उपप्राचार्य व शिक्षकांविरोधात एका महिलेने न्यायालयात तक्रार केली होती.त्यावर न्यायालयाने आदेश देत पोलिसांना दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.(Teachers recruitment scam)
आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी मेहेर नंदन निरगुंदीकर यांनी पोलिसांकडे व न्यायालयात तक्रार दिली होती. निरगुंदीकर यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ,आबासाहेब गरवारे, महाविद्यालय शिक्षक किरण खाजेकर, प्राचार्य पी.बी. बुचडे, तत्कालीन लिपिक, अविनाश गोरे, उपप्राचार्य मोहिनी कुलकर्णी, संस्थेचे आजीव सदस्य गोविंद कुलकर्णी , सहसचिव सुधीर गाडे यांच्यासह तब्बल २९ जणांविरोधात तक्रार दिली होती. गुरुवारी न्यायालयाने याबाबत आदेश दिला असून दोन महिन्यांमध्ये या संदर्भातील तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (MES) आबासाहेब गरवारे महाविद्यालयात 18 बोगस कनिष्ठ महाविद्यालीयन शिक्षकांची भरती केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिलेनं 36 जणांविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.