Pandharpur news : पांडुरंगाला वाहिलेले पोतेभर दागिने निघाले खोटे; कुणी कुणाला फसवलं; सराफांनी भक्तांना की....

पंढरपुरच्या विठ्ठलाला राज्यभरातील भाविक साकडं घालत असतात, देवदेखील आपल्या भक्तांच्या इच्छा पुर्ण करत असतो.
Pandharpur news :
Pandharpur news :

Pandharpur News : पंढरपुरच्या विठ्ठलाला राज्यभरातील भाविक साकडं घालत असतात, देवदेखील आपल्या भक्तांच्या इच्छा पुर्ण करत असतो. आपल्या इच्छा पुर्ण झाल्या की भाविकही भक्तीभावाने विठुरायाच्या चरणी दान अर्पण करत असतात. हे दान कधी रोख पैशाच्या स्वरुपात असते तर कधी दागिन्यांच्या स्वरुपात असतात.

आज पंढरपुरच्या विठुरायाला दान करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये ३१ किलो सोने आणि १ हजार ५० किलो चांदी जमा झाली आहे. याशिवाय नव्याने मोजण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये पोतेभर दागिने हे खोटे असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यात आलेले दागिने पाहता कुणी कुणाला फसवलं, असाही सवाल उपस्थित होत आहे. अशात सराफांकडूनच भाविकांची फसवणूक केली जातेय की काय, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Pandharpur news :
Republicans Parti : रिपब्लिकन युवांना नकोय असले आंबेडकर अन् कवाडे !

खरंतर देवाला खोटे दागिने अर्पण करण्याची गोष्ट काही नवीन नाही. यापुर्वीही अनेकदा दानपेटीतून पैशांसह असे खोटे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. दर महिन्याला दानपेटी उघडल्यानंतर सराफांद्वारे या दागिन्यांची तपासणी केली जाते. सराफ असे खोटे आणि खरे दागिने वेगळे काढतात. त्यामुळे भाविकांनीही सोने खरेदी करताना सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, दरवर्षी विठूरायाच्या खजिन्यात साधारण ३ किलो सोने आणि २०० किलो चांदीची वाढ होत असल्याची माहिती आहे. पण असे देवाच्या चरणी कोणतेही दागिने अर्पण करण्याआधी सोने खरेदी करणाऱ्याने दागिने खरेदी करताना दागिन्यांची पावती घेतली पाहिजे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com