बारामतीकरांना गडकरींचे 778 कोटींचे गिफ्ट...

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा रस्ता चार पदरी होणार
Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama

बारामती : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बारामतीकरांना घसघशीत भेट दिली आहे. उंडवडी कडे पठार ते बारामतीतील देशमुख चौक व ढवाण चौक ते फलटणपर्यंत या दोन रस्त्यांसाठी 778 कोटी 18 लाखांचा निधी मंजूर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या बाबत नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचाच हा टप्पा असून उंडवडी कडे पठार ते बारामतीतील देशमुख चौक हा रस्ता चार पदरी डांबरी करण्यात येणार आहे.

Nitin Gadkari
शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक ; विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार

दरम्यान, बारामती शहरातील नीलम पॅलेस हॉटेलच्या चौकापासून ते थेट फलटणपर्यंत 33 कि. मी. अंतराचा चार पदरी सिमेंट कॉक्रीटचा रस्ता साकारणार आहे. या रस्त्यासाठी अगोदरच भूसंपादन झालेले असल्याने जागेचा प्रश्न येणार नाही, याच्या निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षात हे काम मार्गी लावले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांना दिली.

उंडवडी कडे पठार ते बारामतीतील देशमुख चौकापर्यंतचा रस्ताही चार पदरी होणार असून मध्ये दुभाजक असेल, वारकरी या रस्त्याचा वापर पालखी काळात करत असल्याने हा रस्ता डांबरीकरण होणार आहे. येथेही जागेची अडचण नसल्याचे सांगण्यात आले.

Nitin Gadkari
भाजपकडे कोणते मतदारसंघ, कोणते जिंकले... सविस्तर माहिती द्या! मुख्यमंत्री ठाकरेंचा 'प्लॅन'

या दोन्ही प्रकल्पांमुळे बारामतीचे दळणवळण अधिक मजबूत होईल, बारामती फलटण रस्ता चार पदरी झाल्यामुळे सातारा, कोल्हापूरच्या दिशेने अधिक गतीने मार्गक्रमण करता येईल. पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता असल्याने त्याचा फायदा या दोन्हीही जिल्ह्यातील लोकांना होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com