Pune Crime : पुण्यात गोळीबार करुन 28 लाखाची रोकड लुटणाऱ्यांना 7 जणांना बेड्या...

Pune Crime | शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास अंगडीया यांच्या कार्यालयात दोन कर्मचारी नियमीत काम करत होते.
Pune Crime
Pune Crime

Pune Crime पुणे : मार्केट यार्ड परिसरात गोळीबार कडून दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या दोन दिवसातच बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून 11 लाखाची रोख रक्कम, तीन दुचाकी, मोबाईल असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शनिवारी (१२ नोव्हेंबर) दुपारी साडे बाराच्या सुमारास मार्केट यार्ड येथे घडली होती. मार्केट यार्ड परिसरातील अंगडीयाच्या कार्यालयात भरदिवसा घुसून गोळीबार करत चोरट्यांनी 28 लाखांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने आदित्य अशोक मारणे (वय २८, रा. रामनगर,वारजे), गुरुजनसिंह सेवासिंह विरक (वय २२, वर्षे,शिवाजीनगर), दिपक ओम प्रकाश शर्मा ( वय १९, राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश ( वय २०, मंगळवार पेठ), निलेश बाळू (वय २०, एस. आर. ए. स्कीम, मंगळवार पेठ), अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता ( वय 20, मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे ( वय २३, श्रीराम चौक, वारजे) यांना अटक केली आहे.

Pune Crime
Khatav : मांजरेकरांच्या निषेधार्थ भोसरेत मोर्चा; इतिहासाच्या मोडतोडीवर ग्रामस्थ संतप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरातील गणराज मार्केट इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका पोटमाळावजा जागेत द प्रोफेशनल कुरिअर नावाने अंगडीयाचा यांचा व्यवसाय चालतो. शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास अंगडीया यांच्या कार्यालयात दोन कर्मचारी नियमीत काम करत होते. त्यावेळी अचानक तिथे एक व्यक्ती आला आणि कर्मचारी काम करत असलेल्या काचेच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला. हे पाहून दुसऱ्याने त्याला धक्का देऊन बाहेर काढले आणि काचेचा दरवाजा लावून घेतला.

पण संबंधिताने थेट कोयता काढून केबिनची काच फोडली आणि त्याच्या मागून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने थेट पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. त्यातल्या एकाने केबिनमध्ये घुसून रोख रक्कम रोकड बाहेरील व्यक्तीकडे दिली. त्यांनी रोकड पिशवीमध्ये भरुन तेथून पळ काढला. हा सगळा प्रकार घडत असताना इमारतीच्या बाहेर त्यांचे तीन साथीदार थांबविले होते. दरोडा टाकताच पाचही जणांनी धावत जाऊन पुढे थांबलेल्या दोन दुचाकींवरुन पळ काढला.

पोलिसांनी संबंधित कार्यालय व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरोड्यातील एक आरोपी मावळ तालुक्यातील मोर्वेगाव येथील साई फार्म हाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळताच अधिक तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.आरोपी कारागृहात असतानाच त्यांनी दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला. या गुन्ह्यातील दोन आरोपी मोका लावलेला आहे, त्यामध्ये ते फरारी होते. पोलिसांनी सात जणांना दोन दिवसातच त्यांना अटक केली. आणखी चार-पाच जण फरार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com