५६ हजार विद्यार्थी गणवेशाविना: विद्यार्थ्यांचे गणवेश अडकले खरेदीच्या वादात

Pimpri-Chinchwad News| पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील ५६ हजार विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचितच आहेत
Pimpri-Chinchwad News|
Pimpri-Chinchwad News|

पिंपरी : शाळा सुरु होऊन तीन महिने झाले आहेत. तरीही श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील ५६ हजार विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचितच आहेत. टेंडर काढून हे गणवेश द्यायचे ते त्याच्या खरेदीचे अधिकार मुख्याध्यापकांना द्यायचे या घोळात हे गणवेश रखडले आहेत. त्यावरून पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.गणेश विसर्जनापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत,तर पालिका प्रशासनाची मंत्रालयात तक्रार करेन,असा इशारा आ.बनसोडे यांनी नवे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना दिला आहे.

पिंपरी पालिकेच्या १०५ प्राथमिक शाळांमधून ४३,०००, तर १८ माध्यमिक शाळा व ४ भाग शाळांमध्ये ८००० असे एकूण ५६००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेथील गणवेशाच्या जो़डीने डिजीटल शाळांत इंटरनेटचा अभाव आणि जुन्या,जीर्ण झालेल्या इमारती याकडेही आ. बनसोडे यांनी पालिका प्रशासकांचे लक्ष वेधले आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पालिका शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. पण, हा प्रयत्न कसा फसला आहे, हे आ. बनसोडेंच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या काही शाळांतील डिजीटल वर्गांच्या केलेल्या पाहणीतून उघड झाले आहे.

Pimpri-Chinchwad News|
Jharkhand political crisis | झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; आमदारांना घेऊन मुख्यमंत्री रवाना

या डिजिटल वर्गखोल्यांत इंटरनेट सुविधा नावाला दिलेली आहे. फक्त वायरिंग केले आहे. तसेच त्यासाठी वापरलेले मटेरिअल अत्यंत निकृष्ट व चायना मेड आढळले. तेथील शिक्षक स्वतःच्या मोबाईल Hotspot द्वारे इंटरनेट जोडणी करून विद्यार्थ्याना शिक्षण देताना दिसले.त्यामुळे या शाळांना आ. बनसोडे हे आता स्वत भेट देणार आहेत. तसेच तेथे डिजीटल वर्गांसाठी चिनी बनावटीचा निकृष्ट साहित्य वापरून पालिकेची फसवणूक केली आहे का याचीही खातरजमा करणार असल्याचे त्यांनी `सरकारनामा`ला सांगितले.माझ्या स्थानिक विकास निधीमधून पालिकेच्या १२ वर्ग खोल्या डिजिटल केल्या असून त्याचा शुभारंभ पुढील आठवड्यात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in