वाबळेवाडीचे ५२१ विद्यार्थी यापुढे शाळेत जाणार नाहीत : लवकरच आझाद मैदानावरही मोर्चा

मुलांनी आणि पालकांनी मिळून एकमुखी शाळेत न जाण्याच्या निर्णयाची ही पहिलीच घटना.
वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा
वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळासरकारनामा

शिक्रापूर : वाबळेवाडीचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचेवर दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेकडून तीन महिला जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्याचे निषेधार्थ शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या पुढे शाळेतच न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात एखाद्या शिक्षकासाठी अशा पध्दतीने मुलांनी आणि पालकांनी मिळून एकमुखी शाळेत न जाण्याच्या निर्णयाची ही पहिलीच घटना असून ग्रामस्थ-पालक येत्या राज्य अधिवेशन काळात थेट मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाण्याच्या तयारीत असल्याचे आज (ता.२४) वाबळेवाडी शाळेतील निषेध सभेत जाही करण्यात आले.

वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा
पुणे महानगरपालिका : राग अनावर झाल्याने नगरसेविका कदम भांडल्या आणि मग रडल्या !

प्रवेशासाठी देणगी घेणे, त्याचा हिशोब ग्रामस्थांच्या नावावर करणे आदी तक्रारीवरुन जुलैमध्ये वाबळेवाडी शाळेची चौकशी सुरू करण्यात आली. त्याच्या प्राथमिक अहवालात फार काही निष्पन्न झाले नसल्याने वारे यांचेवर नवीन आरोप करीत त्यांच्या वैयक्तिक जमिनींबाबत प्रश्न उपस्थित करुन त्यांची चौकशी होईपर्यंत त्यांचे निलंबनाची मागणी दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, सविता बगाटे, सुनिता गावडे व शिरुरच्या सभापती मोनिका हरगुडे यांनी केली. प्रचंड आक्रमकतेने केलेल्या या मागणीनंतर सीईओ आयुष प्रसाद यांनी वारे यांचे निलंबन जाहीर केले. मात्र, याचे पडसाद जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात पडू लागले आणि आज सकाळीचे शाळेतील सर्व ५२१ विद्यार्थी-पालक एकत्र आले व त्यांनी निषेध सभा आयोजित करुन वरील सर्व पदाधिका-यांचा निषेध करुन वरील निर्णय जाहिर केला.

वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा
राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची

विद्यार्थ्यांच्या वतीने आशुतोष वाघ, किरण तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान चार महिन्यांपूर्वी वाबळेवाडीतील २५० महिला जिल्हा परिषदेत जावून जिल्हा शिक्षणाधिका-यांना भेटले होते व सीईओ आयुष प्रसाद यांचेशी संपर्क साधल्यावर वारे यांचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे पाठविल्याचे सांगत कारवाई आपण करणार नसल्याचे सांगितले. मात्र, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत शिरुरच्या चार जिल्हा परिषद महिला सदस्यांनी प्रचंड गोंधळ घालीत निलंबनाची मागणी केल्यानुसार निलंबन झाले. त्याचेच तीव्र व संतप्त पडसाद काल पासून वाबळेवाडीत उमटले व आज उत्स्फूर्तपणे निषेध सभा पार पडली. यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा वाबळे, आपचे तालुकाध्यक्ष अशोक धुमाळ, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश थोरात, पालक पौर्णिमा राऊत, मनिषा ठोंबरे, दिपाली बारगळ, मिनाक्षी चौधरी, शुभांगी तांबे, भरत नवगिरे, निवृत्त पोलिस उपअधिक्षक अरुण सोंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत शेलक्या भाषेत संबंधित राजकीय पदाधिका-यांचा समाचार घेतला.

दरम्यान उत्स्पूर्तपणे जमलेल्या वाबळेवाडीकर ग्रामस्थ, पालक-महिला व विद्यार्थ्यांनीही एकमुखी निर्णय जाहीर करीत सांगितले की, वारे यांनी शाळेची ओळख जगात करुन दिली, त्यांचा त्याग इथे न येणाराला कधीच समजणार नाही. आरोप करुन धुरळा उडवण्या-यांच्यावर कारवाई आणि गुरुजींचे निलंबन मागे घेईपर्यंत आम्ही कुणीच शाळेत जाणार नाही. यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदेंसह गावातील सर्व घरांतील आबालवृध्द उपस्थित होते.

हायकोर्टात याचिका तर दाखल होणारच...!

केवळ फुकटचा सन्मान मिळत नाही याच कारणाने संतप्त राजकारण्यांनी शाळेला आणि वारे सरांना बदनाम करण्याचे षडयंत्र कसे रचले, शेवटाला नेलेय त्याचे सर्व कागदोपत्री पुरावे संकलीत झालेले आहेत. याबाबत लवकरच हायकोर्टात याचिका दाखल करुन सर्वांनाच न्यायालयात खेचणार असल्याचे व हा संपूर्ण खर्च आपण वैयक्तिक करणार असल्याचे यावेळी निवृत्त ‘डीवायएसपी’ अरुण सोंडे यांनी जाहीर केले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com