50 'खोके'वाले एकदम ओक्के : पालकमंत्री नसल्याने जनता अस्वस्थ...

Supriya Sule : 'विरोधात असला की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपात गेला की वॉशिंग मशीन'
Supriya Sule, Eknath Shinde
Supriya Sule, Eknath ShindeSarkarnama

पुणे : भाजपमध्ये गेले की ईडी (ED) किंवा अन्य कोणत्याही चौकशी लागत नाही, असे मी नाही तर भाजपमध्ये गेलेले नेतेच बोलतात. विरोधात असला की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा चौकशी मागे लावल्या जातात. भाजपाकडे वॉशिंग-मशीन आहे का ? भाजपमध्ये गेलेला स्वच्छ होतो,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर केली आहे. त्यांनी इंदापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशाच्या अर्थमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांचे मी मनापासून स्वागत करते. केंद्रातील व्यक्ती बारामतीत आली तर ती अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. अर्थमंत्री सितारमण या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध भागात तीन दिवस राहणार असल्याचे समजते. या वेळेत त्यांना कोणत्या संस्था किंवा वास्तू बघण्यासाठी मदत हवी असेल तर त्यांना बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून माझी सहकार्याची भूमिका असेल, तसेच आमच्या घरीही त्यांचे स्वागतच होईल,असा उपरोधिक टोला खासदार सुळेंनी लगावला.

महाराष्ट्रातील 'वेदांता' प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याने आम्ही आंदोलन करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलून महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधानांना विनंती करावी की, हा प्रकल्प राज्यात यावा. हा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे,असे म्हणतात की विद्यमान मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी 'वेदांता'चे मालक यांना या प्रकल्पाच्या बाबतीत पत्र लिहून तारीख मागितली होती. तसेच सदर प्रोजेक्ट महाराष्ट्रातच होईल,असे सभागृहात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची आठवणही सुळे यांनी करून दिली.

Supriya Sule, Eknath Shinde
२०२४ मध्ये 'शत प्रतिशत' भाजप की शिंदे सरकार? चंद्रकांतदादा म्हणतात, काळ ठरवेल...

प्रताप सरनाईकांना ईडीने दिलेल्या क्लोजर रिपोर्ट अहवाल सादर केला जाणार आहे. यावर बोलतांना त्या म्हणाल्या, याबाबत मला आश्चर्य वाटत नाही. भाजपमधील अनेक जण असे म्हणतात की, जर आपण भाजपमध्ये गेलो तर कोणत्याही यंत्रणेचा त्रास होत नाही. विरोधात असला की तुम्हाला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपात गेला की वॉशिंग-मशीनमध्ये तुम्ही एकदम साफ होता,असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, '50 खोक्के'वाले समाधानी पण पालकमंत्री नसल्याने जनता मात्र अस्वस्थ आहे. गेल्या अडीच महिन्यापूर्वी पन्नास खोकेवाल्यांनी सत्ता ओरबाडून घेतल्याने 50 खोकेवाले समाधानी आहेत. तर निरा डावा कालवा आस्तरीकरण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री असणे आवश्यक होते. मात्र तेच नसल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in