पुणे जिल्ह्यावर काळाचा घाला : चासकमानमध्ये ४ विद्यार्थी तर भाटघर धरणात ५ महिलांचा बुडून मृत्यू

पुणे (PUNE) जिल्ह्यात एकाच वेळी या दोन घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे
Chaskaman dam
Chaskaman damsarkarnama

गुंडाळवाडी : खेड (Khed) तालुक्यातील चास कमान धरणाच्या जलाशयात सह्याद्री स्कूलचे पोहायला गेलेले ४ विद्यार्थी बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. या बाबत खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

गुंडाळवाडी येथील तिवई हिल येथे सह्याद्री हे इंटरनॅशनल स्कूल असून येथे निवासी विद्यार्थी (Student) आहेत. शुक्रवार पासून शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विद्यार्थ्यी पोहण्याचा सराव करण्यासाठी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चास कमान धरणाच्या जलाशयात गेले होते. शिक्षकांच्या म्हणण्या नुसार कांही विद्यार्थी कमरे एवढ्या पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आल्याने या लाटेत ६ ते ७ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या वेळी शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत काही विद्यार्थी तीरावर आणले.

Chaskaman dam
दुर्दैवी : भाटघर धरणात बुडून पाच महिलांचा मृत्यू; मुलीला वाचविण्यात यश

मात्र, त्यातील ४ विद्यार्थी खोल पाण्यात बुडाले. या मध्ये परीक्षित अग्रवाल, रितीन डीडी हि २ मुले तर तनिशा देसाई व नव्व्या भोसले या २ विध्यार्थिनी बुडाल्या. या घटनेची माहित कळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या घेत विध्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा पर्यंत सर्व चारही मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले. याबाबत खेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यासह त्यांचे सहकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. चारही मुले उच्च सोसायटी वर्गातील परराज्यातील असल्याची माहिती आहे.

दरम्यान, भोर (Bhor) तालुक्यातील भाटघर धरणात बुडून पाच विवाहित महिलांचा मृत्यू झाला. ही दुर्घटनाही आज (ता. १९ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या पाचही जणी पुण्यातील रहिवासी असून त्या पाहुण्यांकडे आल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी याच धरणात बोट उलटून १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे.

Chaskaman dam
राष्ट्रवादीचा बार फुसका; संग्राम थोपटेंसह १० जणांची ‘राजगड’वर बिनविरोध निवड!

खुशबू लंकेश रजपूत (वय १९, रा बावधन), मनीषा लखन रजपूत (वय २०), चांदनी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघीही रा संतोषनगर, हडपसर पुणे) मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा नऱ्हे, पुणे) अशी मृत महिलांची नावे आहेत. यातील खूशबू आणि चांदनी यांचे मृतदेह अजून मिळालेली नाहीत, उर्वरीत तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com