Pune News : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा माण ग्रामपंचायतीला दणका; तब्बल 'एवढा' दंड ठोठावला

National Green Tribunal : तसेच वन खात्याच्या ताब्यातील अवैध डम्पिंग साईटवर कचरा टाकण्यास मनाई केली आहे.
National Green Tribunal
National Green Tribunal Sarkarnama

Maan Gram Panchayat : बेकायदेशीर कचरा डम्पिंगमुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने माण ग्रामपंचायतीला मोठा दणका दिला आहे. तब्बल ३४ लाखांचा दंड माण ग्रामपंचायतीला ठोठावला आहे. तसेच वन खात्याच्या ताब्यातील अवैध डम्पिंग साईटवर कचरा टाकण्यास मनाई केली आहे.

हिंजवडीमधील फेज तीनमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानाबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हा दंड ठोठावला आहे. एनजीटीचे अध्यक्ष दिनेश कुमार सिंग आणि डॉ.विजय कुलकर्णी यांनी हा निकाल दिला.

National Green Tribunal
Zilla Parishad : कर्मचारी संपावर गेल्यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प; कार्यालयात शुकशुकाट

याबाबत हिंजवडी फेज -३ जवळील एका सोसायटीने माण ग्राम पंचायतीच्या अवैध कचरा डम्पिंग विरोधात एनजीटीत दावा दाखल केला होता. या दाव्यावर सुनावणी होऊन तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर एनजीटीने हा आदेश दिला.

सोसायटीतील रहिवाशांच्यावतीने ॲड.सौरभ कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. तर राज्य पर्यावरण विभागाच्यावतीने ॲड.अनिरुद्ध कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

National Green Tribunal
PCMC Budget 2023 : पिंपरी-चिंचवड पालिकेचा अर्थसंकल्प : भाजपकडून कौतूक तर राष्ट्रवादीची टीका

या कचऱ्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून तेथील स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचरा पेटवून दिला जात असल्याने धुराचे लोट तेथे निर्माण होत आहेत. त्यामुळे सोसायटीने दावा दाखल केल्याचे अर्जात नमूद आहे.

एनजीटीने दिलेल्या आदेशानुसार माण ग्रामपंचायतीने कचऱ्याचे डम्पिंग काढण्यात यावे. ग्रामपंचायतीने ३४ लाख रुपयांचा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) जमा करायचा आहे.

National Green Tribunal
Nitin Deshmukh : नितीन देशमुखांचे उपोषण मागे; पण कारवाईची टांगती तलवार कायम

मंडळाने त्यातून कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि यंत्रणा निर्माण करून माण ग्रामपंचायत हद्दीतील कचरा निर्मूलन प्रश्नावर आणि पर्यावरण संवर्धनावर खर्च करण्यात यावा. माण पंचायतीला या कामासाठी लागणारी जागा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुरवायची आहे.

ग्रामपंचायत जोपर्यंत कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करत नाही तोपर्यंत तिला दरमहा एक लाख रुपये दंड एमपीसीबीकडे जमा करायचा आहे, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in