Crime News : पाच लाखांच्या बदल्यात ३० लाख देणार; तोतया आमदाराला पुण्यात अटक, काय आहे प्रकरण?

Pune Crime : वानवडी पोलिसांनी सापळा रचून टोळीचा केला पर्दाफाश
Crime News
Crime NewsSarkarnama

Pune Crime News : आपण उत्तर प्रदेश राज्यातील मंत्री असल्याचे भासवून पुण्यातील एका व्यावसायिकाला पाच लाखांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखविले. मात्र पाच लाख घेऊनही बनावट नोटा न देता त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दाखल गुन्ह्यानुसार वानवडी पोलिसांनी तोतया आमदारासह बनावट नोटांचे आमिष दाखवून फसविणाऱ्या टोळीला गुरुवारी (ता. २७) रात्री अटक केली. दरम्यान, या प्रकरणी खराडी येथील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली होती.

Crime News
Bhor Bazar Samiti Result : संग्राम थोपटेंनी राष्ट्रवादीसह सर्वपक्षीयांना ताकद दाखवली : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी (Pune Police) रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (चौघे रा. निलंगा, जि. लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फिर्यादीच्या मदतीने सापळा रचून नाशिक फाटा येथे रुपाली राऊत, संजयकुमार पांडे आणि विकासकुमार रावत यांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे. तसेच, किती लोकांची फसवणूक केली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

Crime News
Brijbhushan Singh : ब्रृजभूषण सिंग राजीनाम्यास तयार, कुस्तीपटूंची अटकेची मागणी; आता लढाई आरपारची !

वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील ५४ वर्षीय व्यावसायिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खराडी बायपास येथे फिर्यादीची रुपाली नावाच्या महिलेसोबत ओळख झाली होती. त्या महिलेने आपण उत्तरप्रदेश राज्याच्या (Uttar Pradesh) मंत्री असल्याचे भासविले. तसेच तीनपट पैसे मिळवून देण्याची योजना फिर्यादीस सांगितली.

तिने आरोपी पांडे हा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असल्याचे सांगून फिर्यादीचे बोलणे करून दिले. तसेच पाच लाख रुपये दिल्यास बनवाट ३० लाख रुपये मिळतील, असे सांगितले. आरोपीने सांगितलेली योजना फिर्यादीला आवडली. त्यानुसार ते ३० मार्च रोजी एसआरपीएफ ग्रुप परमारनगर येथे इतर आरोपींना भेटले. त्यावेळी पांडे याने साथीदारांसोबत येऊन रसायनांचा वापर करून बनावट नोटा (Crime News) तयार करण्याचे प्रात्यक्षिकच फिर्यादीला दाखविले.

Crime News
Pune News : महाआघाडीची सत्ता जाताच सोमय्यांना धक्काबुकी करणाऱ्या शिवसेनेच्या चौघांना अटक : गुन्ह्यांची कलमेही वाढवली

या प्रात्यक्षिकानंतर फिर्यादीचा आरोपींच्या योजनेवर विश्वास बसला. त्यानंतर व्यावसायिकाने आरोपींना ५ लाख ३४ हजार रुपये दिले. पाच लाख रुपये देऊनही आरोपींनी व्यावसायिकास ३० लाख रुपये दिले नाहीत. त्यानंतर फिर्यादीने त्यांना दिलेले पाच लाख ३४ हजार रुपये परत मागितले. त्यावर आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com