बारामती बॅंकेसाठी राष्ट्रवादी जुन्यांना कायम ठेवणार की नव्यांना संधी देणार?

बारामती सहकारी बँकेच्या 15 जागांसाठी 235 उमेदवारी अर्ज दाखल
बारामती बॅंकेसाठी राष्ट्रवादी जुन्यांना कायम ठेवणार की नव्यांना संधी देणार?
Baramati Co-operative BankSarkarnama

बारामती : बारामती सहकारी बँकेच्या (Baramati Co-operative Bank) पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. 22 नोव्हेंबर) 15 जागांसाठी 235 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, बॅंकेचे अनेक संचालक पुन्हा लढविण्यास इच्छूक आहेत, हे त्यांनी भरलेल्या अर्जावरून दिसून येत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) श्रेष्ठी त्यांना संधी देतात की नव्या चेहऱ्यांना पसंती देतात, याचे उत्तर माघारीच्या दिवशी मिळणार आहे. (235 applications filed for 15 posts of Baramati Co-operative Bank)

Baramati Co-operative Bank
गृहमंत्री वळसे पाटलांच्या भीमाशंकर कारखान्याने फोडली एफआरपीची कोंडी!

सर्वसाधारण प्रभागासाठी 158 अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव प्रवर्गासाठी 16, इतर मागासवर्ग प्रवर्ग- 25, अनुसूचित जाती जमाती- 17 तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी 26 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (ता. 23 नोव्हेंबर) होणार आहे, तर बुधवारी (ता. 24 नोव्हेंबर) वैध अर्ज असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. येत्या 8 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असून आवश्यकता भासल्यास 19 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Baramati Co-operative Bank
दुखावलेले पृथ्वीराज जाचक राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवणार का?

बारामती सहकारी बॅंकेच्या अनेक विद्यमान संचालकांनीही पुन्हा एकदा आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बॅंकेत पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. नॉनशेड्यूल्ड क्षेत्रातील पुणे विभागातील सर्वात मोठी बँक म्हणून नावलौकीक असलेल्या बारामती बँकेच्या सहा जिल्ह्यांमध्ये 36 शाखा असून 2260 कोटींच्या ठेवी, तर 1525 कोटींचे कर्ज वाटप आहे. बारामती सहकारी बँकेचे तब्बल 16 हजार 456 सभासद आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in