पुणे,पिंपरीतील अनधिकृत २१६ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाने रद्द होणार

RTO|Driving School : ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू असल्याच्या मुद्द्याकडे आमदार लक्ष्मण जगतापांनी विधानसभेचे लक्ष वेधले.
Driving School Pune-Pimpri Latest News
Driving School Pune-Pimpri Latest NewsSarkarnama

पिंपरी : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे आजारी असल्याने सध्या सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मुंबईला गेलेले नाहीत. तरीही त्यांनी ३७ ताराकिंत प्रश्न दिले होते. त्यातील एकाच्या लेखी शासकीय उत्तरातून पिंपरी-चिंचवडसह पुण्यात अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट झाल्याचे समजले आहे. (Driving School Pune-Pimpri Latest News)

Driving School Pune-Pimpri Latest News
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराची मुख्यमंत्र्यांची घोषणा; विधानसभेची मंजुरी

पिंपरी-चिंचवड, पुणे या दोन्ही शहरांत वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू असल्याच्या मुद्द्याकडे जगतापांनी विधानसभेचे लक्ष वेधले होते. दोन्ही शहरात किती मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही सुरू आहेत, त्यावर शासनाने काय कारवाई केली?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले. त्यात या दोन्ही शहरात ६९ मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण न करता सुरू असून २१६ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचे म्हटले आहे.

Driving School Pune-Pimpri Latest News
Raj Thackeray | पुण्यात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातील अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू आहेत. 'आरटीओ'कडून घेतलेल्या परवान्याचे नूतनीकरण त्यांनी केलेले नाही. आरटीओने देखील त्यांची तपासणी केलेली नाही. त्यावर आमदार जगताप यांनी प्रश्न विचारला होता. त्यांच्या उत्तरानुसार “पुणे आरटीओ कार्यालयाच्या रेकॉर्डवरील मंजूर ५०३ मोटार ड्रायव्हिंग स्कूलपैकी २८७ मोटार ड्रायव्हिंग स्कूलना सारथी ४.० प्रणालीवर लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. त्यातील २१८ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना वैध आहे. उर्वरित ६९ स्कूलची त्याची मुदत संपलेली आहे. त्यांनी त्याचे नूतनीकरणही केलेले नाही. त्यांना त्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. त्यांचे लॉगीन बंद करण्यात आले आहे. उर्वरित २१६ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com