पिंपरी चिंचवडमध्ये १४ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतूसे जप्त

शहरात होणारे आणखी काही खून तथा मोठे अनुचित प्रकार टाळल्याचा दावा पोलिसांनी मंगळवारी केला.
pistol-cartridges
pistol-cartridgessarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) सांगवी आणि चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दोन खळबळजनक खुनाच्या घटना नुकत्याच घडल्याने शहर पोलिस सतर्क झाले होते. त्यातून त्यांनी बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या तस्करीचा माग घेण्यास सुरवात केली अन त्यांच्या हातात घबाड सापडले. तब्बल १४ अवैध पिस्तूले (pistols) व आठ जिवंत काडतूसे असा मोठा शस्त्रसाठा त्यांच्या हाती आला. त्यामुळे शहरात होणारे आणखी काही खून तथा मोठे अनुचित प्रकार टाळल्याचा दावा पोलिसांनी मंगळवारी (ता. १८ जानेवारी) केला. (14 pistols and eight live cartridges seized in Pimpri Chinchwad)

मध्य प्रदेशातून या बेकायदेशीर पिस्तूलांची तस्करी करून ती पिंपरी-चिंचवडमध्ये विकण्यात येत होती. त्यात शहरातील दोन सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्याकडून याअगोदरही २४ पिस्तूले पकडण्यात आली आहेत. हे दोघे व त्यांचा आणखी एक साथीदार अशा तिघांसह त्यांच्याकडून ही शस्त्रे विकत घेणारा अशा चौघांची धरपकड शहर पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने केली. वडमुखवाडी, चऱ्होली येथे एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना तिघांना प्रथम पकडण्यात आले. त्याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे आणि उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि पिस्तूले पकडणाऱ्या पथकाचे कौतूकही केले.

pistol-cartridges
विशाल फटेला बार्शीच्या कोर्टात उभे केले आणि त्याचे वकिल म्हणाले....

आकाश अनिल मिसाळ (वय २१, रा. भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. चोपडा,जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. पाषाण, पुणे) आणि अजित ऊर्फ विकगी रामलाल गुप्ता (वय २८, रा. भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. गुप्ता याने पहिल्या तिघांकडून दोन पिस्तूले विकत घेतली होती.

pistol-cartridges
रिक्षातून SP ऑफिसमध्ये पोचला अन्‌ म्हणाला ‘मी विशाल फटे...’ : पोलिसांनीच ओळखले नाही!

आकाश, रुपेश आणि ऋतिक हे वडमुखवाडी येथे एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची टीप दरोडा विरोधी पथकातील पोलिस नाईक सागर शेडगे यांना मिळाली होती, त्यानुसार या पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दोन टीम तयार करून सापळा लावत या तिघांची धरपकड केली. त्यावेळी त्यांच्याकडे दोन पिस्तूल, दोन राऊंड, तीन मोबाईल, मिरची पूड आणि नायलॉनचा दोर मिळून आला. त्यांच्या घर झडतीत दहा गावठी कट्टे व काडतूसे सापडली. त्यांच्या चौकशीतून त्यांनी दोन पिस्तूले गुप्ताला विकल्याचे समजताच त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूले हस्तगत करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com