तपश्चर्या फळाला आली! राज्य पोलिस सेवेतील १४ अधिकारी झाले आयपीएस

आयपीएस (IPS) दर्जा मिळाल्याने या सर्व अधिकाऱ्यांना नव्या आयपीएस अधिकाऱ्यांसारखे एक वर्षे प्रोबेशन पिरीअडवर रहावे लागणार आहे.
IPS
IPS

पिंपरी : महाराष्ट्र पोलिस सेवेतील (Maharashtra Police Service) १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय पोलिस सेवेत (IPS) सामावून घेण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी (ता.१४) केंद्र सरकारने हा आदेश काढला. त्यामुळे संक्रातीचीच ही भेट या अधिकाऱ्यांना ही मिळाली. त्यासाठी त्यांना एक तप (१४ वर्षे) वाट पहावी लागली आहे. त्यातील विश्व पानसरे (Vishwa Paansare) (पुणे रेल्वे), श्रीमती स्मार्तन पाटील (Smartan Patil) या अधिकाऱ्यांनी पुण्यात (Pune) सेवा बजावलेली आहे. पाटील यांना,तर खऱ्या अर्थाने हे संक्रांतीचे वाण मिळाले असेच म्हणायला हवे. (Maharashtra Police Latest News)

IPS
चुका होत असल्यास कळवा, दुरुस्त करू; पण स्वार्थापोटी विरोध करू नका...

आयपीएस दर्जा मिळाल्याने या सर्व अधिकाऱ्यांना नव्या आयपीएस अधिकाऱ्यांसारखे एक वर्षे प्रोबेशन पिरीअडवर रहावे लागणार आहे. म्हणजे त्यांचा हा उमेदवारीचा काळ असणार आहे. तसेच नव्या आयपीएस अधिकाऱ्यांप्रमाणे इंडक्शन ट्रेनिंगही त्यांना घ्यावे लागणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या महाराष्ट्र पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची भारतीय पोलिस सेवेत निवड केली. त्यांचा आदेश केंद्रीय गृह विभागाचे अप्पर सचिव रमन कुमार यांनी काल जारी केला. दरवर्षी राज्य पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना आय़पीएसमध्ये समावून घेतले जाते. त्यानुसार २०१९ साठी या कॅटेगिरीत आठ, तर २०२० ला सहा जागा रिक्त झाल्या होत्या. तेथे या १४ अधिकाऱ्यांची निवड करून त्या भरण्यात आल्या आहेत.

मोहन दहिकर, एन. ए. अष्टेकर, विश्व पानसरे, वसंत जाधव, श्रीमती स्मार्तन पाटील, एस.डी. कोकाटे, पी.एम.मोहिते, संजय लाटकर, सुनील भारव्दाज, एस.डी. कडासने, संजय बारकुंड, डी.एस.स्वामी, अमोल तांबे आणि एस. पी. निशाणदार अशी आयपीएस केडर मिळालेल्या महाराष्ट्र् राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची नावे आहेत. हे नोटीफिकेशन जारी झालेल्या दिवसापासून म्हणजे १४ जानेवारीपासूनच आयपीएसमध्ये या सर्वांच्या नेमणूकाही करण्यात आल्या आहेत.याअगोदर पुणे जिल्ह्यातीलच जातेगावचे व पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेले शहाजी उमापांसह काही मपोसे अधिकाऱ्यांना अशाप्रकारे भापोसेत समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in