'सीरम' च्या आदर पूनावाला यांना एक कोटींचा गंडा ; बनावट WhatsApp मेसेजव्दारे फसवणूक

aadar poonawala :कंपनीचे मालक आदर पूनावाला यांचा मेसेज आल्याने त्यांनी तातडीने पैसे भरण्यास सांगितले.
aadar poonawala
aadar poonawalasarkarnama

पुणे : 'कोविशिल्ड' या कोरोना लसीचा पुरवठा करणारे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे (serum institute)प्रमुख आदर पूनावाला (aadar poonawala) यांना एक कोटींचा गंडा घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (aadar poonawala latest news)

७ ते ८ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने हा प्रकार घडला आहे.याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे वित्तीय अधिकारी सागर कित्तुर (वय ४४, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कित्तुर हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये वित्तीय व्यवस्थापक आहेत तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत़ .

आदर पूनावाला यांच्या मोबाईल नंबरवरून बनावट व्हॉटसअॅप मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगून तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

aadar poonawala
मोठी बातमी : शिंदे गटाचा एक आमदार कमी होणार ? ; लता सोनवणे यांना दिलासा नाहीच !

आदर पूनावाला हे सीरम कंपनीचे सीईओ पदावर काम करतात.तर कंपनीच्या संचालक पदावर सतीश देशपांडे आहेत. देशपांडे यांच्या मोबाईलवर कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्या मेसेज मध्ये काही बँक खाती नंबर देण्यात आलेली होती. या नंबरवर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगण्यात आले होते.

कंपनीचे मालक आदर पूनावाला यांचा मेसेज आल्याने व त्यांनी तातडीने पैसे भरण्यास सांगितल्याने देशपांडे यांनी याबाबतची माहिती सागर कित्तूर यांना दिली. त्यानंतर कित्तुर यांनी बनावट मेसेजद्वारे आलेल्या विविध बँक खात्यावर एक कोटी एक लाख एक हजार रुपये भरले.

याबाबत कित्तुर यांनी कंपनीत चर्चा केल्यानंतर, त्यांना आदर पुनावाला यांनी अशाप्रकारे विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास कोणत्याही मेसेज केलेला नव्हता ही बाब उघडकीस आली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in