शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर 

रिडींग न घेता तसेच एखाद्याने सलग तीन महिने वीज बिल भरले असले तरीही परत वाढीव बिले आलेली आहेत.
Shiv Sena electricity bill.jpeg
Shiv Sena electricity bill.jpeg

पुणे : पुण्यातील शिवसेनेच्या पर्वती विभाग प्रमुखानेच वाढत्या वीज बिलाविरोधात सरकारला घराचा आहेर दिला आहे. वीज बिल कमी करावे, यासाठी वीज वितरण कार्यालयात सात हजार रूपयांची चिल्लर रक्कम कार्यकारी अभियंत्याला देण्यात आली. 

कोरोना या आजारामुळे लोकांना कामधंदे नसल्यामुळे पैशाची टंचाई भासत आहे. आज उपासमारीची वेळ आलेली आहे, पण  वीज वितरण खात्यामार्फत  जनतेचा कुठलाही विचार न करता अंदाजचे अवाढव्य, अशी विजेची बिले आलेली आहेत, कुठल्याही प्रकारची रिडींग न घेता तसेच  एखाद्याने सलग तीन महिने वीज बिल  भरले असले तरीही परत वाढीव बिले आलेली आहेत.

हि बाब लक्षात यावी वीज वितरण कुठलीच ठोस भूमिका घेत नाहीत, म्हणून  जनतेकडे पैसे नाहीत हे  दर्शवण्यासाठी बिलाची रक्कम चिल्लर स्वरूपात आज देण्यात आली. आपण ठोस भुमिका घेतली नाही तर, या पुढे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा सेना पार्वती विभाग प्रमुख्य सूरज लोखंडे यांनी दिला आहे. सात हजार रूपयांची चिल्लर यावेळी जमा करण्यात आली. 

हेही वाचा: राऊत म्हणाले, "माफी मागण्याचा विचार करेन.." 
मुंबई : "सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत माफी मागण्याच्या विचार करेन, प्रसारमाध्यमांनी यात पडू नये," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. इथं जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जातंय. सुशांतसिंह प्रकरणात राजकारन न करता, राज्य, देश कसा पुढे जाईल, याचा विचार आपण केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

सुशांतसिंह प्रकरणामुळे राज्य सरकार अस्थिर असून ते पडेल का या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणले, "सरकार अजिबात अस्थिर नसून ते पडणार नाही. जर असे झाले तर अगोदर केंद्र सरकार पडेल. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिसच सक्षम आहे. ते हा तपास पुढे नेतील. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुशांतसिंह प्रकरणाच्या नोटिशीची मला कल्पना नाही. आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही. आम्ही सर्व एक आहोत, असे राऊत यांनी नमूद केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com