राज्यातील पहिला प्रयोग; पुणे जिल्हा परिषदेची व्हिडिओ कॉन्फरन्सवर स्थायी सभा

तंत्रज्ञानाची जोड देत पुणे जिल्हा परिषदेने चक्क व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे स्थायी सभेची बैठक काल (ता.२४) प़ंचायतराजदिनी घेतली. अशी बैठक घेणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.
pune zp conducts standing committee meeting through video conference
pune zp conducts standing committee meeting through video conference

पुणे : राज्यात सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक तोटा पंचायतराज संस्थांना बसू लागला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात असलेल्या पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि पुणे शहरात असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना सभेसाठी एकत्र आणणे तसे अवघडच. पण याला तंत्रज्ञानाची जोड देत पुणे जिल्हा परिषदेने चक्क व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे स्थायी सभेची बैठक काल (ता.२४) प़ंचायतराजदिनी घेतली. अशी बैठक घेणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.

जिल्हा परिषद म्हटलं की, संबंधित जिल्ह्याचे मिनी मंत्रालय. या संस्थेचे मुख्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असते. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेचे  पुणे शहरात आहे. जिल्हा परिषद आध्यक्षा निर्मला पानसरे या उत्तर पुणे जिल्ह्यात येत असलेल्या खेड तर, उपाध्यक्ष रणजित शिवतरे हे जिल्ह्याच्या दक्षिण भागात येत असलेल्या भोर तालुक्यातील आहेत. विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापतीही विविध तालुक्यात विखुरलेले. अशाही कठीण परिस्थितीवर मात करत जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा पार पाडण्यात पुणे जिल्हा परिषदेला यश आले आले. हा योगायोग राष्ट्रीय पंचायतराजदिनी जुळून आला आहे. 

या पहिल्याच व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सर्व विषय समित्यांचे सभापती, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आणि सर्व खातेप्रमुख झेडपी मुख्यालयातून, उपाध्यक्ष रणजित शिवतरे हे भोरमधून,  भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील हे खेड तालुक्यातील वराळे, सदस्या कल्पना जगताप या हवेली तालुक्यातील अष्टापूर येथून तर सरंजामी समितीचे अन्य सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती आपापल्या पंचायत समितीच्या मुख्यालयातून या सभेत सहभागी झाले. दरम्यान, या सभेनंतर जलसंधारण समितीची सभाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com