बारामती, दौंड, मावळ तालुक्‍याला एक सभापतीपद मिळणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने, पुणे जिल्हा परिषदेतही शिवसेनेला एक सभापतिपद द्यावे आणि महाविकास आघाडीचा धर्म पाळावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
pune zp committee election
pune zp committee election

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी शुक्रवारी (ता. 24) होणार आहेत. यासाठी वीरधवल जगदाळे, प्रमोद काकडे, मीनाक्षी तावरे, पूजा पारगे, बाबूराव वायकर, अंकुश आमले, सारिका पानसरे, शोभा कदम, कुसुम काशिकर, अंजली कांबळे, अर्चना कामठे आदी सदस्य स्पर्धेत आहेत.

दरम्यान, चारपैकी बारामती, दौंड आणि मावळ या तीन तालुक्‍यांना प्रत्येकी एक सभापती पद दिले जाणार असल्याचे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. चौथ्या सभापतिपदासाठी इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्‍यांमध्ये तीव्र स्पर्धा असणार आहे. 

जिल्ह्यातील तेरापैकी पुरंदर आणि वेल्हे या दोन तालुक्‍यांत जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच पदांच्या स्पर्धेत पहिल्यापासूनच हे दोन्ही तालुके बाद झालेले आहेत. 

उर्वरित अकरापैकी खेड तालुक्‍याला अध्यक्षपद आणि भोर तालुक्‍याला उपाध्यक्षपद देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके विषय समिती सभापती निवडीच्या स्पर्धेतून बाद झाले आहेत. उर्वरित नऊ तालुक्‍यांपैकी मावळ, बारामती आणि दौंड या तालुक्‍यांना प्रत्येकी एक सभापतिपद देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एका पदासाठी सहा तालुक्‍यांत स्पर्धा असली तरी भोरला उपाध्यक्षपद दिल्याने मुळशी आणि इंदापूर व आंबेगावला मंत्रिपद दिल्याने आणि मावळला प्रत्येकी एक पदाधिकारी या तालुक्‍यातील असल्याने हे दोन्ही तालुके सभापतिपदाच्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. याला केवळ बारामती तालुका अपवाद केला जाणार आहे. त्यामुळे चौथ्या सभापतिपदासाठी शिरूर, हवेली आणि जुन्नर हे तीन तालुके तीव्र स्पर्धेत असल्याचेही या नेत्याने सांगितले. 

महाविकास आघाडी नको... 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने, पुणे जिल्हा परिषदेतही शिवसेनेला एक सभापतिपद द्यावे आणि महाविकास आघाडीचा धर्म पाळावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र, या मागणीला जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचा तीव्र विरोध आहे. स्पष्ट बहुमत नसलेल्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांमध्ये महाविकास आघाडी करणे आणि नियमानुसार प्रत्येकाला पदाचे वाटप करणे योग्य आहे. परंतु पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे येथे महाविकास आघाडी करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 
 
समितीनिहाय संभाव्य सभापती ? 

  • बांधकाम व आरोग्य -  प्रमोद काकडे किंवा बाबूराव वायकर 
  • कृषी व पशुसंवर्धन -  वीरधवल जगदाळे किंवा अंकुश आमले 
  •  महिला व बालकल्याण - मीनाक्षी तावरे किंवा पूजा पारगे 
  • सामाजिक न्याय -  सारिका पानसरे, गणेश कदम किंवा अंजली कांबळे  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com