निर्मला पानसरे पुणे झेडपीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी शिवतरे

 निर्मला पानसरे पुणे झेडपीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी शिवतरे

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्‍यातील निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्‍यातील रणजित शिवतरे यांची निवड झाली आहे. या निवडीने खेड तालुक्‍याला पहिल्यांदाच अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. पानसरे या खेड तालुक्‍यातील रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या आहेत. याआधी त्यांनी बहुळी गावच्या सरपंचपदी काम केले आहे. 

शिवतरे हे भोर तालुक्‍यातील उत्रोली- कारी गटातून निवडून आले आहेत. शिवतरे यांनी याआधी या कालावधीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी काम केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता विशेष सर्वसाधारण सभा झाली. या सभेत या दोघांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.अध्यक्षपदासाठी यावेळी तीव्र स्पर्धा होती. सुमारे अठरा महिला इच्छुक होत्या. त्यामुळे अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याविषयी प्रचंड उत्सुकता होती. 

सर्व इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांनी घेतल्या. यामधून आज पानसरे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठीदेखील इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, जिल्ह्यातील सत्ता समतोल साधण्यासाठी पुरंदर तालुक्‍याला संधी देण्यात आली होती. मागील अडीच वर्षात विश्‍वास देवकते हे बारामती तालुक्‍यातील अध्यक्ष तर विवेक वळसे-पाटील आंबेगाव तालुक्‍यातील उपाध्यक्ष बनले होते. यावेळी पुरंदर व भोर तालुक्‍याला ही संधी मिळाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com