... म्हणून कोरोना योद्ध्यांना विश्वजित कदम यांनी केला सलाम!

स्वतः पीपीई किट घालून केली पाहणी
vishwjeet Kadam ppe ki
vishwjeet Kadam ppe ki

पुणे : कोरोना संसर्गाविरोधातील युद्धामध्ये प्रयत्नांची शर्थ करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांना कोरोनायोद्धे का म्हणतात, याचा प्रत्यय आपल्याला युद्धभूमीवर, म्हणजेच प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर येतो, अशी भावना सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे. 

याबाबतचा अनुभव त्यांनी कथन केला. त्यांनी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये थेट कोरोना वॉर्डात जाऊन मी डॉक्टर, नर्सेस आणि पेशंटसमवेत संवाद साधला. साधारण ४० ते ४५ मिनिटे या वॉर्डात मी पीपीई किट घालून  होतो. अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी अवस्था होत होती. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मग या रुग्णांची सेवा करताना बारा-बारा तास पीपीई किट घालून हे कोरोना योद्धे कसे काम करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी! कुणाच्या घरी चिमुकली आपल्या आईची वाट पाहत असेल, तर कोणाचे कुटुंबीय काळजीने त्रस्त असतील. पण, या कोरोना विरोधातील लढाईत स्वतःच्या जिवाची, परिवाराची तमा न बाळगता या डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे सेवाकार्य गेले वर्षभर अथकपणे सुरू आहे. भारती हॉस्पिटल व वैद्यकीय सेवांचे जाळे उभारताना स्वर्गीय पतंगराव कदम यांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा संस्कार दिला होता. आज पीपीई किटमधील देवदूत हाच जनसेवेचा वसा मनोभावे आचरत आहेत. त्यांच्या कार्याला माझा पुन्हा एकदा मनापासून सलाम! जनसेवेच्या या संस्काराला सर्वतोपरीने पुढे नेण्याचा, त्याला पाठबळ देण्याचा निर्धार मीदेखील या निमित्ताने पुन्हा व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com