आई मंत्री असल्याचा बडेजाव राजीवनी काॅलेजमध्ये कधीच मिरवला नाही.....

सातव यांचे शिक्षण पुण्यात झाले होते...
rajeev satav- vasant wagh
rajeev satav- vasant wagh

पुणे : अत्यंत संयमी आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा आमच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा (Fergusson College) विद्यार्थी देश पातळीवर काम करू लागल्याचा आनंद होता. अधून-मधून आम्ही संपर्कात असायचो. कॉलेजला असताना महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने माझा त्यावेळी विद्यार्थी असलेल्या सातव यांच्याशी संपर्क आला. तो शेवटपर्यंत राहिला. सातव यांच्या रूपाने देश पातळीवर अत्यंत हुशार आणि सयंमी नेतृत्व उभे राहात होते. सातव यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने एक चांगले नेतृत्व गमावल्याची भावना फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वसंत वाघ यांनी व्यक्त केली. (Congress leader Rajiv Satav no more) 

प्राचार्य वाघ अनेक वर्षे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. या काळात १९९५ च्या दरम्यान राजीव सातव या महाविद्यालयात शिकत होते. त्या काळात महाविद्यालयीन निवडणुका होत असत. या निवडणुकांच्या निमित्ताने विद्यार्थी असलेल्या सातव यांचा तेव्हाचे प्राचार्य वसंत वाघ यांच्याशी संपर्क आला होता. त्या काळातल्या सातव यांच्या आठवणी प्राचार्य वाघ यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितल्या.

राजीव वनस्पतीशास्त्र विषय घेवून बी.एसस्सी. करीत होता त्यावेळी मी प्राचार्य होतो. युवा नेता म्हणून उभरते नेतृत्व सहज जाणवत होते. माझे त्याच्याशी वैयक्तिक नाते होते. नेहमी घरी यायचा. माझ्या दोन्ही मुलाना नांवानिशी ओळखायचा. विनम्रता, मितभाषी, आपल्या मताशी प्रामाणिक, स्पष्टवक्तेपणा, राजकारणाची आवड हे त्याचे मला त्यावेळी जाणवलेले गुण. मी सांगितलेला संवाद त्याने मला सांगितला होता. राष्ट्रीय पातळीवरील त्याच्या कारकीर्दीची ती सुरुवात होती, अशी आठवण वाघ यांनी सांगितली. 

ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयीन निवडणुका लढविताना त्याकाळात अनेक चुकीच्या आणि अप्रिय गोष्टी होत होत्या. प्राचार्य म्हणून त्याला लगाम घालण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत असू. मात्र, या साऱ्या प्रकारांना सातव अपवाद होते. अत्यंत शांत, संयमी व नेहमी नम्रतेने बोलण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे हा विद्यार्थी त्यावेळी माझ्या लक्षात राहिला. त्या काळात सातव यांच्या मातोश्री रजनी सातव राज्यात मंत्री होत्या. मात्र, राजीव यांच्या वागण्यात कधीही आई मंत्री असल्याचा रूबाब जाणवला नाही. सुरवातीपासूनच पाय जमिनीवर असल्याने पुढे राजकारणात ते यशाची शिखरे गाठत राहिले. खासदार आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस झाल्यानंतरही ते मधून-मधून माझ्या संपर्कात होते. अगदी आता रूग्णालयात असतानाही मोबाईलवर त्यांना निरोप पाठविला होता. तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र, दुर्देवाने या काळात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.’’

मैत्रीला जागणारा मित्र या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी प्रदीप देशमुख यांनी सातव यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, ‘‘ फर्ग्युसन महाविद्यालयात आम्ही एत्र होतो. आम्ही एकत्र निवडणुकाही लढविल्या. पुडे आमचे पक्ष वेगळे झाले. तरी आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. मैत्रीला जागणारा आणि पाय नेहमी जमिनीवर असणारा मित्र आज गमावला.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com