वडे तळता तळता जानकर म्हणाले....लोकसभा लढवणार! (व्हिडिओ) - Will Fight Loksabha Election Hints Ex Minister Mahadev Janakr | Politics Marathi News - Sarkarnama

वडे तळता तळता जानकर म्हणाले....लोकसभा लढवणार! (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर जानकर यांनी सुरुवातीला राहाता तालुक्‍यात मुक्काम केला. त्यांनंतर ते बीड जिल्ह्यातील गुत्तेगाव या ठिकाणी गेले. तेथे राहून त्यांनी वाघमोडे कुटुंबाला शेतीच्या कामात मदत केली. ते दररोज शेतात जात होते. वाघमोडे कुटुंबातील लोकांच्या सोबत वैरण काढणे, औत चालवणे अशी शेतातील कामे त्यांनी केली आहेत

बारामती : महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे शेतात काम करीत असताना चा व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांनी आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे काही कामानिमित्त आले असता या गावात रस्त्यालगत असणार्‍या वडा-पावाच्या हात गाड्या वरती थांबून स्वतः वडापाव तळत खाण्याचा आनंद लुटला. आपण पुढील लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी वड्याची चव चाखत चाखत कार्यकर्त्यांना सांगितले.

जानकर काही दिवसांपूर्वीच सुमारे  सहा महिन्यांनी आपल्या आईला भेटले होते. सहा महिन्यांनी मायलेकरांची गळाभेट झाली. या वेळी आईने त्यांच्या गालावर हात फिरवत,"बाळा कसा आहेस?' अशा शब्दांत त्यांची चौकशी केली होती. महादेव जानकर गेली २७ वर्षे घरी गेलेले नाहीत. त्यांची आई त्यांच्या बहिणीच्या घरी वीरकरवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे आहेत. त्यांना भेटायला महादेव जानकर गेले होते. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर जानकर यांनी सुरुवातीला राहाता तालुक्‍यात मुक्काम केला. त्यांनंतर ते बीड जिल्ह्यातील गुत्तेगाव या ठिकाणी गेले. तेथे राहून त्यांनी वाघमोडे कुटुंबाला शेतीच्या कामात मदत केली. ते दररोज शेतात जात होते. वाघमोडे कुटुंबातील लोकांच्या सोबत वैरण काढणे, औत चालवणे अशी शेतातील कामे त्यांनी केली आहेत. याच काळात त्यांनी रामायण आणि महाभारत या ग्रंथांचे वाचन केले. तसेच, योगाचाही अभ्यास केला. याच दरम्यान त्यांनी तिथल्या आश्रमावर जाऊन प्रवचने ऐकल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोना काळात राज्यभर दौरा

कोरोना लाॅकडाऊनच्या काळात जानकर राज्यभर फिरत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांचा बैलगाडीतून प्रवास करत असलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनी हा फोटो कार्यकर्त्यांच्या शेतात जात असतानाचा असल्याचे सांगितले होते. कोरोना लॉकडाऊन नंतर महादेव जानकर यांनी नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये  मुक्काम केला होता. सुरुवातीला ते राहाता तालुक्यात रहात होते. 

दोनच दिवसांपूर्वी जानकर आमदार महादेव जानकर माण, खटाव,सांगोला,जत,आटपाडी,सांगोला या तालुक्याचा दौरा करत होते. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव आबा देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आबांशी बोलताना त्यांना,"आबा,तुम्ही आत्मचरित्र लिहा."अशी विनंती केली होती.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख