जे बोलतात ते करणारे अजितदादा!

२२ जुलै - आजचा वाढदिवस - अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य -पंतप्रधानांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत व उपराष्ट्रपतींपासून ते विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही ज्या बारामतीच्या विकासाचे तोंडभरुन कौतुक केले त्याचे खरे शिल्पकार अजित पवार आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे
22nd July, Ajit Pawar Birthday
22nd July, Ajit Pawar Birthday

राज्यात जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक मतदारसंघात नेत्यांकडून जी भाषणे केली जातात, तेव्हा आपल्या मतदारसंघाची आम्ही बारामती करुन दाखवू...असे आश्वासन दिले जाते. बारामतीचा जसा सर्वांगिण विकास झाला आहे, त्याच धर्तीवरचा विकास तेथे अभिप्रेत असतो. एखाद्या गावाचे नेतृत्व इच्छाशक्तीने भारलेले असेल तर त्याचे टुमदार शहरात कसे रुपांतर होऊ शकते याचे उदाहरण म्हणून राज्यात बारामतीकडे पाहिले जाते. 

पंतप्रधानांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत व उपराष्ट्रपतींपासून ते विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही ज्या बारामतीच्या विकासाचे तोंडभरुन कौतुक केले त्याचे खरे शिल्पकार अजित पवार आहेत. निवडणुकीपुरते राजकारण उर्वरित काळात समाजाकारण हे पवार कुटुंबियांच्या राजकारणाचे ब्रीद आहे. विकासकेंद्रीत कार्यशैलीचा अवलंब अजित पवारांनी अगदी सुरवातीपासून केला. इतर राजकारण्यांप्रमाणे आपली कार्यशैली न ठेवता त्यांनी सार्वजनिक विकासावर आपल्या कामाचा भर सातत्याने ठेवला. आपल्या कामातील अधिकाधिक वेळसार्वजनिक हिताची कामे करण्याचा त्यांचा अगदी आजही अट्टाहास असतो. 

विकासासाठी पदाचा वापर

मिळालेल्या पदाचा वापर सर्वांगिण विकासासाठी कसा करता येईल व त्यातून समाजाच्या प्रत्येक घटकाचे हित कसे साधता येईल याचा प्रयत्न त्यांच्या कामातून दिसतो. कडक व रोखठोक स्वभावाचे असूनही गेल्या तीस वर्षांपासून अजित पवार हे बारामतीतील मतदारांच्या गळ्यातील ताईत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनीही सभा घेऊन बारामतीकरांनी त्यांच्यावर कायम विश्वास दाखविला. पक्ष कोणताही असो सत्ता कोणाचीही असो, बारामतीकर सातत्याने अजित पवार यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याचे कारण त्यांनी या शहरासाठी केलेले काम. 

जबरदस्त संघटनकौशल्य

विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करुन राज्यात विक्रमी मतांनी विजयी होणे येरागबाळ्याचे काम नाही, हा विक्रमही अजित पवार यांनी घडवून दाखवला. अजित पवार व बारामती यांची नाळ किती घट्ट जोडलेली आहे, याचेच हे प्रतिक म्हणावे लागेल. केवळ बारामतीपुरताच नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा सर्वच ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदारांसह विविध पदाधिका-यांच्या माध्यमातून मोठी ताकद उभी केली. त्यांचे संघटनकौशल्य जबरदस्त आहे. 

राज्याच्या कानाकोप-यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काम करावे तर अजित पवार यांनीच यावर आजही राज्यातील अनेकांचा विश्वास आहे. झटपट निर्णय घेण्याची सवय, व्यापक हिताला प्राधान्य देण्याचा स्वभाव या मुळे विरोधकही त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतात. सत्तेत असतानाही त्यांनी कधीच सत्ताधारी किंवा विरोधक असा दुजाभाव केला नाही, त्या मुळेच विरोधक असतानाही अजित पवार यांची कामे सत्ताधारी आमदारांपेक्षाही वेगाने होत असत. 

स्पष्टवक्तेपणा हा गुण

स्पष्ट, रोखठोक व कोणाचीही भीडभाड न ठेवता खर बोलायचं...एकतर शब्द द्यायचा नाही आणि शब्द दिलाच तर तो शेवटपर्यंत पाळायचा हा त्यांचा स्वभाव असल्याने राजकारणात असूनही अजित पवार यांच्या शब्दाला महत्व असते. 

विकासाबाबत संवेदनशील

जे बोलतो तेच करतो ही त्यांची ख्याती आहे. मात्र ते रोखठोक वाटत असले तरी स्वभावाने ते तितकेच हळवे व मृदूही आहेत. ते एखाद्या वेळेस चिडतातही पण कामही तेच करतात हे महत्वाचे असते. निर्णय घेताना फक्त निर्णयच घेतले जात नाही तर त्यांची जबाबदारीही स्वताः स्विकारून ते खंबीरपणे उभे राहतात. त्या मुळे हल्लीच्या राजकारणताही अजित पवार यांची भूमिका महत्वाची मानली जाते. पक्षीय राजकारणापलिकडे सर्वांगिण हित व विकास या दोन मुद्यावर ते कमालीचे संवेदनशील असतात. एखादे काम करायचे ठरवल्यावर त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यापासून ते काम शेवटपर्यंत तडीला नेण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे. 

शिस्त, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छतेची आवड, व्यसनांपासून चार हात लांब असे राजकारणात फारसे न दिसणारे सर्वच गुण त्यांच्या अंगी आहेत. राजकारणातील ग्लॅमरच्या मागे आजची युवा पिढी धावते पण राजकारण करतानाही कष्ट, मेहनत व परिश्रम किती महत्वाचे असतात हे अजित पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसते. पहाटे पाच पासून कामाला सुरवात होते तो दिवस रात्रीच्या बारापर्यंत कायमच असतो. रात्रीचा दिवस करणे कशाला म्हणतात हे त्यांची कार्यशैली पाहिल्यानंतर समजते. दररोज शेकडो लोकांना भेटून त्यांची कामे मार्गी लावण्यासह, बैठका, दौरे, भेटी गाठी या व्यापात ते कार्यमग्न असतात. राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचा त्यांचा ध्यास आहे. एक धडाडीचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे, आजही राज्यातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक अशी त्यांची प्रतिमा आहे. 

(Edited By - Amit Golwalkar)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com