पुणे पालिकेत राष्ट्रवादीच्या सत्तेसाठी अजितदादांचे पहिले पाऊल : 23 गावांचा निर्णय झाला...

पुण्याची नवी हद्द ही मुंबई महापालिकेला मागे टाकणार....
pune-villages
pune-villages

पुणे : पुणे महापालिकेत उर्वरित 23 गावे समाविष्ट करण्यासाठीच्या हालचाली अखेर राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. याबाबत नगरविकास विभागाने पुणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून अहवाल मागितला आहे. 

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यादृष्टीने हा निर्णय दूरगामी करणारा ठरणार आहे. या बहुतांश गावांत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळेच या गावांचा समावेश पुणे महापालिकेत सत्ता येण्यासाठी राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत हा निर्णय होणार असून राष्ट्रवादीचे पाऊल त्यादृष्टीने पडल्याचे बोलले जात आहे. ही गावे पालिकेत घेण्यास भाजपचा विरोध होता. पालिकेला या गावांचा आर्थिक बोजा परवडणार नसल्याची भूमिका विद्यमान पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. यामागे राजकीय कारण देखील होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसरचे आमदार चेतन तुपे, शिरूर-हवेलीचे अशोक पवार या राष्ट्रवादीच्या  आमदारांशी यावर चर्चा केली. त्यात ही गावे पुणे पालिकेतच घेत असल्याचे त्यांनी या आमदारांना सांगितले.  

पालिकेत 34 गावे समाविष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात टप्प्याटप्प्याने ही गावे 31 डिसेंबर 2020 पर्यंत आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असे राज्य सरकारने आश्वासन दिले होते. त्यानुसार 11 गावे या आधीच समाविष्ट झाली आहेत.

उर्वरित २३ गावांचा निर्णय प्रलंबित होता. त्या गावांच्या समावेशासाठीचे पत्र 24 नोव्हेंबर रोजी नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातून तातडीने पालिकेला पाठविण्यात आले. जी गावे पालिकेत घ्यायची आहेत ती पुढीलप्रमाणे :

(१) म्हाळुंगे

(२) सूस

(३) बावधन बु

(४) किरकिटवाडी

| (५) पिसोळी

(६) कोइवे-धावडे

(৩) न्यू कोपरे

(८) नांदेड

(९) खडकवासला

(१०) मांजरी बु.(११) नऱ्हे (१२) मंतरवारडी 

(१३)होळकरवाडी
 
(१४)औताडे-हांडेवाडी
 
(१५)वडायी वाडी
 
(१६)शेवाळेवाडी
 
(१७) नांदोशी

(१८) मांगडेवाडी

(१९) भिलारेवाडी

(२०) गुजर- निंबाळकरवाडी 

२२)जांभुळवाडी

(२२) कोळेवाडी

(२३)वाघोली 

या गावांबाबत काय निर्णय घ्यावा, हे अभिप्रायसह तातडीने कळवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. जयश्री कटारे यानी पुणे महापालिकेला कळविले आहे. या गावांची स्वतंत्र महापालिका करण्याचा प्रस्ताव आता मागे पडला असून पुणे महापालिकेतच समावेश कायम असल्याचे या पत्रांतून स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारने पाठवलेले हे आहे ते पत्र....

..............

प्रति,

जिल्हाधिकारी,

पुणे

दिनांक :-२४ नोव्हेंबर २०२०

विषय : पुणे महानगरपालिकेची हहवाढ करणेबाबत.

संदभ :- १) आपले पत्र क्र.पसप-३/कावि/१२७/२०१४. दि.३१.०१.२०१४ २) शासन अधिसूचना क्र.पीएमसी-३०१४/प्र.क्र.६४/नवि-२२.

दि.२९,०५.२०१४

३) शासन अधिसूचना क्र.पीएमसो-३०१४/प्र.क्र.६४/नवि-२२,

दि.४.१०.२०१७

महोदय,

आपल्या संदर्भाधीन पत्रान्वये प्राप्त प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ३४ गावांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने दि.२९.०५.२०१४ रोजी प्राथमिक अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती. (सोबत प्रत) तसेच दि.०४.१०.२०१७ च्या अधिसूचनेन्वये उपरोक्त ३४ गावांपैकी ११ गावांच्या समावेशनाबाबतची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. (सोबत प्रत)

उर्वरित २३ गावांचा टण्याटप्प्याने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने नगर विकास विभागाच्या दि.१३,०७.२०१७ च्या पत्रान्वये रिट याचिका क्र.१११७१/२०१६ या प्रकरणी मा.उच्च न्यायालयास कळविण्याल आले होते. (सोबत दि.१३.०७.२०१७ च्या पत्राची प्रत) त्यास अनुसरून समाविष्ट करावयाच्या विषयाधीन गावांच्या क्षेत्राचा तपशिल, तसेच गावांचा समावेश केल्यानंतर पुणे शहराची होणारी सुधारीत हर, सहें नंबर, जी गावे अंशत: घ्यावयाची आहेत त्यांचा क्षेत्रनिहाय तपशिल अनुसूची १ व अनुसूची २ मचोल विहित विवरणपत्रात भरून आपल्या अभिप्रायासह शासनास तातडीन सादर करावा, हो विनंती. (सोबत (विचाराधीन २३ गावांची यादी, (२) अनुसूची १ व अनुसूची २ ची विवरणपत्रे )

३. सदर माहिती पाठविताना मंतरवाडी या संपूर्ण गावाचे महसूली क्षेत्र समाविष्ट करायचे को आधी काही क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट आहे व उर्वरित क्षेत्र समाविष्ट कराच्याचे ही बावहो तपासाबी.

आपला,

(सतीश मोघे, उप सचिव, महाराष्ट्र शासन)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com