कोरोना लशीच्या बूस्टर डोसबाबत अजित पवार म्हणाले, पैसे देऊन घ्या! 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी कोरोना लशीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस घेतल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे.
Dy CM Ajit Pawar talks about covid vaccines booster dose
Dy CM Ajit Pawar talks about covid vaccines booster dose

पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी कोरोना लशीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस घेतल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी प्रत्येकाला हा डोस घ्यावा लागेल, असंही म्हटलं होतं. त्यानंतर देशभरात बूस्टर डोसची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (Dy CM Ajit Pawar talks about covid vaccines booster dose)

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना बूस्टर डोसबाबत अजित पवार म्हणाले, काही आमदारांनी सांगितलं ज्यांनी दोन घेतलेत त्यांना बुस्टर डोस द्यावा. आधी राज्यातील नागरिकांना किमान दोन डोस तरी द्यायला हवेत. नंतर बूस्टर डोसचा विचार करू. बूस्टर डोस देण्याबाबत राज्य सरकार सहमत आहे. पण 18 वर्षांवरील नागरिकांना दोन डोस दिल्यानंतरच याचा विचार केला जाईल. एखाद्याने स्वत:च्या पैशाने घेतला तर त्याला कुणाचीही ना नसेल, असं पवार यांनी स्पष्ट केलं. 

आता दुसऱ्या डोसला प्राधान्य देणार

पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा 70 लाखाचा टप्पा पार केला आहे. जागतिक स्तरावर दैनंदिन पाच ते सहा लाख रुग्ण आढळत आहेत. तिसऱ्या लाटेसाठी ही धोक्याची सुचना आहे. पुणे जिल्ह्यात चार आठवड्यात रुग्ण कमी झाले आहेत. परंतु संभाव्य लाटेच्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लशीचा दुसरा डोस वेळेत दिला नाही तर त्याचा तेवढा उपयोग होणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यात नवीन व्यक्तीला डोस देण्याऐवजी दुसरा डोस राहिलाय त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, असं पवार यांनी सांगितलं.  

पुण्याला लस देण्यास पूनावाला तयार पण...

पुण्याला लशीचे अतिरिक्त डोस देण्याबाबत सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याशी विभागीय आयुक्त सौरभ राव यांचं बोलणं झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पवार म्हणाले, लस देशाच्या वेगवेगळ्या भागात पुरवण्याचा ताण आमच्या कंपनीवर आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. साधारण त्यांनाही वाटते की पुण्यात लस द्यायला हवी. त्यांचं लहानपण पुण्यात गेलंय, संस्था पुण्यात आले. त्यामुळे पुण्याला लस देण्याबाबत कसा मार्ग काढता येईल, याबाबत ते सकारात्मक आहेत. शहरापुरता का होईना मार्ग काढतील. असा मार्ग काढला तर त्या लशीचा वापर गरीब नागरिकांसाठी करण्याचा प्रयत्न राहील, असं पवार यांनी स्पष्ट केलं.  

भारत बायोटेकलाही साकडं घालणार

पूनावालांशी जसं आम्ही बोलत आहोत, तसंच भारत बायोटेकशीही बोलणार आहोत. जागा दिली, वेळ लावला नाही. पण आम्ही त्यांची कंपीन पुणे परिसरात येणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राला प्राधान्य द्या, असं त्यांना सांगू, असंही अजित पवार यांनी सांगितलं. त्यावेळी बऱ्यापैकी लसीकरण झाले असेल, त्यामुळं लस देण्यात अडचण येणार नाही, असंही पवार म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com