विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे निधन 

विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे निधन 

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांची दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजता ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.  

डावखरे हे 1986 ला ठाणे महापालिकेचे नगरसेवक बनले. 1992 पासून सातत्याने 4 वेळा ते विधान परिषदेवर निवडून जात होते. 1998 ला पहिल्यांदा परिषदेचे उपसभापती झाले. गतनिवडणुकीपर्यंत त्यांनी उपसभपापतीपद भूषवले. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते सातत्याने आजारी होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची नुकतीच भेट घेऊन विचारपूस केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com