आजचा वाढदिवस : रुपाली चाकणकर, महिला प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस

३१ मे -अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची महिला आघाडी समर्थ करण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा आज वाढदिवस आहे
Roopali Chakankar Birthday
Roopali Chakankar Birthday

पुणे :  अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची महिला आघाडी समर्थ करण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा आज वाढदिवस आहे.

दौडमधील शेतकरी कुटुंबातील बबन बोराटे यांच्या चाकणकर कन्या. त्यांचे शिक्षण रयत संस्थेतील साधना कॉलेजमध्ये झाले.पु ढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्याने पुढे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा प्रवास आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी काही दिवसच राष्ट्रवादीच्या तत्कालिन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला होता. त्याच वेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, आणि जयंत पाटील यांनी बारा तासाच्या आत त्यावेळी पुण्याच्या शहराध्यक्ष असणाऱ्या  चाकणकर यांची प्रदेशअध्यक्ष पदी निवड केली होती. या काळात राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर नेते सोडून जात होते. पक्ष संकटात आला होता. निवडणुकीत पक्षाला किमान तीस ते चाळीस जागा मिळतील की नाही अशी शंका  उपस्थित केली जात होती. अशा कठीण काळात प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी चाकणकर यांनी  पेलली. कठीण वेळात पक्षाला चाकणकार यांनी साथ दिली, अशी वेळोवेळी चर्चा होत असते 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com