आजचा वाढदिवस : चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रकांत बच्चू पाटील - जन्म१० जून १९५९सार्वजनिक जीवनात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत बच्चू पाटील यांचा आज वाढदिवस. चंद्रकांत पाटील आमदार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी महसूल, सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
Chandrakant Patil Birthday
Chandrakant Patil Birthday

सार्वजनिक जीवनात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत बच्चू पाटील यांचा आज वाढदिवस. चंद्रकांत पाटील आमदार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी महसूल, सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले आहे. 

विद्यार्थीदशेत असताना चंद्रकांत दादा पाटील यांचा संपर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला. १९८० सालच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या प्रचार अभ्यास वर्गात चंद्रकांतदादा पाटील यांना पूर्णवेळ प्रचारक म्हणून नेमण्यात आले. विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री आणि महामंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करायला सुरुवात केली. १९९५ ते १९९९ या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभागाचे कार्यवाह होते. भारतीय जनता पक्षाचे नेते (स्व.) प्रमोद महाजन, (स्व.) गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी भाजपचे काम करायला सुरुवात केली.

२००९ मध्ये पक्षाने त्यांनी पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवली व ते विजयी झाले. सन २०१३ रोजी त्यांना पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमण्यात आले. २०१४ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले. पहिल्या मंत्रिमंडळात ते सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम मंत्री होते. नोहेंबर २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर करुन, त्याचा कायदा होण्यात चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

२०१९ मध्ये त्यांनी पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते विजयी झाले. त्याच वर्षी पुन्हा एकदा त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com