चार दिवसांच्या जागरणानंतर शिक्रापूर पोलिसांना ३५ हजारांचे पारितोषिक!

चार दिवसांच्या जागरणानंतर शिक्रापूर पोलिसांना ३५ हजारांचे पारितोषिक!

शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील १ जानेवारीचा अभिवादन दिन साजरा होण्यासाटी कष्ट उपसलेल्या शिक्रापूर पोलिसांचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक केले.

पाटील यांनी शिक्रापूर पोलिसांना तब्बल ३५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहिर केले. विशेष म्हणजे एवढ्या रकमेचे पारितोषिक पोलिसांना पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात दिले गेले आहे.  `शिक्रापूर पोलिस चार दिवस झोपलेच नाहीत` ही बातमी `सरकारनामा`त प्रसिद्ध झाल्यानंतर या पोलिसांचे कष्ट समाजासमोर आले आणि त्यानंतर हे पारितोषिक मिळाले. असेच पारितोषिक लोणीकंद ठाण्यातील पोलिसांनाही देण्यात येणार आहे. 

कोरेगाव भीमा येथील एक जानेवारीचा अभिवादन दिन साजरा करण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. प्रचंड संख्येने या दिनी गर्दी जमली होती. त्यासाठी चार दिवस आधी पोलिस बंदोबस्ताची तयारी सुरू होती. तब्बल पाच हजार कर्मचारी त्यासाठी तैनात केले होते. त्या आधीपासून शिक्रापूर पोलिसांनी परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई करून संशयितांना जेरबंद केले होते. बंदोबस्ताची तयारी ते अभिवादन दिन अशा चार दिवसांत हे पोलिस झोपलेच नव्हते. 
 
पोलिसांच्या या कामगिरीची बातमी `सरकारनामा`ने दोन जानेवारी रोजी प्रसिद्ध केली. ती बातमी राज्यभर व्हायरल झाली. जिल्हा पोलिसांच्या एका व्हाटस अॅप ग्रुपवर ही बातमी अधीक्षक डॉ. पाटील यांनी वाचताच त्याचा अगदी तिस-या मिनिटाला त्यांनी पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला.

पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार,  सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्या मुख्य समन्वयातून फौजदार मनोज निलंगेकर, प्रशांत माने, गणेश वारुळे, शिवशांत खोसे व सोमनाथ दिवटे या पाच अधिका-यांच्या एकुण ५२ कर्मचा-यांच्या पाच टिम तयार करुन तब्बल दोन महिने सर्वस्तरांवर काम केले होते. अशीच कामगिरी लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या टीमनेही केली. त्यांनाही पारितोषिक दिले जाणार आहे.


शिक्रापूरच्या सहा अधिका-यांसह टीमलिडर असलेले पोलिस नाईक ब्रम्हा पोवार, ए. व्ही. आंबेकर, संदीप जगदाळे, दत्तात्रय शिंदे, एस. के.रासकर, बी. व्ही. गाले, बी. टी. कुंभार, ए .व्ही. पठारे, व्ही. बी. बाठे आदी कर्मचाऱ्यांनी या पारितोषिकाबद्दल आनंद व्यक्त केला. 
   
मुख्यमंत्र्यांकडूनही पोलिसांचे कौतुक... 

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक तारखेच्या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. तर राजकीय प्रतिनिधी म्हणून आमदार बाबूराव पाचर्णे हे वढु बुद्रुक येथे दिवसभर तळ ठोकून होते. एक तारखेच्या यशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि बंदोबस्तातील सर्व कर्मचा-यांचे विशेष सत्काराचे आयोजन करण्याची सूचना यावेळी पाचर्णेंना केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com