पुणेकरांचा नाद करायचा नाही : संदीप रानडेंचा हा कोरोनावरचा व्हिडिओ घालतोय धुमाकुळ - Pune Singer Sandip Ranade Song on Corona Going Viral on Social Media | Politics Marathi News - Sarkarnama

पुणेकरांचा नाद करायचा नाही : संदीप रानडेंचा हा कोरोनावरचा व्हिडिओ घालतोय धुमाकुळ

भरत पचंगे
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोनावर संदीप रानडे नामक एका पुणेकराची बसंत रागातील एक चिज सोशल मिडीयावर चांगलीच धुमाकुळ घालते आहे. कोरोनासाठीच्या दक्षता काय घ्याव्यात, कशा घ्याव्यात आणि अशा काळात कुणी घाबरुन जावू नये अशा अर्थाची शब्दावली असलेली ही चिज मजेशीर तर झाली

शिक्रापूर : ’कोरोना’वर संदीप रानडे नामक एका पुणेकराची बसंत रागातील एक चिज सोशल मिडीयावर चांगलीच धुमाकुळ घालते आहे. कोरोनासाठीच्या दक्षता काय घ्याव्यात, कशा घ्याव्यात आणि अशा काळात कुणी घाबरुन जावू नये अशा अर्थाची शब्दावली असलेली ही चिज मजेशीर तर झालीच आहे. शिवाय इतर रेकॉर्डींगला कोरोनाच्या दक्षता कारणाने अन्य कुणी साथीदार वापरण्याऐवजी त्यांनी स्वत:च विकसीत केलेले नाद साधना अ‍ॅप्स वापरल्याने ती रंजकही झालेली आहे. 

ना करो, ना करो, सुनो मेरी बात...
ना Corona करो, सुनो मेरी बात..
न मिलाओ हात, हम जोडत हात..
न लगाओ मुख से मैले हाथ..

ना करो, ना करो, सुनो मेरी बात...

मत डरो, घर रहो कुछ दिन रात
Corona पे मिल करोना मात
जग करो निरोगी दिनानाथ...!

हीच ती रानडे यांची करोनावरील चिज. याबाबत त्यांचेशीच संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेली माहितीही रंजक अशीच मिळाली. त्यांनी सांगितले की, सध्या आपल्याकडेच नाही तर जगात करोना शिवाय दूसरे काहीच ऐकायला मिळत नाही. १८ तारखेला पहाटे तीनच्या सुमारास एक रचना डोक्यात घोळली आणि ती लगेच शब्दबध्द होताना ती बसंत मध्ये बांधलीही गेली. हे सर्व लगेच मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि काल (दि.१९) सकाळी माझ्याच नाद साधना या अ‍ॅप्समध्ये मी गावून रेकॉर्डींग केली व शोशल मिडीयावर व्हायरल केली. 

मुळात मी पं.जसराजींकडे गाणं शिकून पुढे करीअर म्हणून अमेरिकेत पाच वर्षे गुगलमध्ये काम करुन भारतात परतलो. मात्र सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून माझे करिअर संभाळताना गाणं, माझ्यातला कलाकार मला स्वस्थ बसून देत नाही. त्याच अनुषंगाने मी काही दिवसांपूर्वी गाण्याला नैसर्गिक (माणवी) साथीसारखे साथ करणारे नाद साधना नावाचे एक अ‍ॅप विकसित केले. या अ‍ॅपचा फायदा मला कोरोनाच्या गाण्यावेळी झाला. कारण कुणाही साथीदारांसह हे गाणं मी रेकॉर्ड करु शकलो आणि ते केवळ संगीतप्रेमींपर्यंतच पोहचविले असे नाही तर कोरोनाच्या बाबती अगदी शास्त्रीय संगीताच्या भाषेतही दक्षता सुचना आपल्या पोहचवू शकतो त्याचा अनुभवही मला या निमित्त्ताने जगभरातील रसिकांच्या द्वारे मला मिळाला. 

''या गाण्यासाठी उत्स्फूर्तपणे गायला गेलेला राग बसंत येवू घातलाय आणि त्याच काळात कोरोनाही भारतात आलाय. पर्यायाने एकाचे पॉझिटिव्ह व एकाचे निगेटिव्ह आगमण हे पॉझिटिव्ह बसंताच्या माध्यमातून प्रभावी होईल आणि आपण सगळे मिळून कोरोनाला परतवू, असा विचार या रचनेद्वारे मी केलाय. १२-१५ वर्षे अमेरिकेत आल्यावर भारतात, भारतीयांसाठी, भारतियांच्या आवडत्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून अश कठीण काळी काही वेगळं करण्याचा आनंद यातून मिळत असून कोरोनाबाबत आपण दक्ष राहू हाच संदेश मी या गाण्यातून देतोय आणि नेटक-यांच्या फिडबॅकवरुन मी तरी समाधानी आहे,'' असेही ते म्हणाले. पर्यायाने कोरोनाच्या भीषण वातावरणातही पुणेकर संदीप रानडेंचा नाद करायचा नाय, असे म्हणल्यास आता वावगे वाटू नये एवढंच.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख