चंद्रकांत पाटलांच्या भूमिकेमुळे पुण्यात भाजपा आमदार खूष, तर शिवसेनेत अस्वस्थता 

विद्यमान आमदारांच्या जागांवर भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीत चर्चा होणार नाही, या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे पुण्यातील विद्यमान भाजपा आमदारांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार खूष तर शिवसेनेत अस्वस्थता अशी स्थिती आहे.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे : विद्यमान आमदारांच्या जागांवर भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीत चर्चा होणार नाही, या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे पुण्यातील विद्यमान भाजपा आमदारांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार खूष तर शिवसेनेत अस्वस्थता अशी स्थिती आहे. 

दोन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा व युतीतील मित्र पक्षांना सोडून उरलेल्या जागांवर युतीत चर्चा र्हाईल, अशी भूमिका पाटील गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मांडत आहेत. पुण्यातील सर्वच्या सर्व आठ विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. यातील किमान दोन व कमाल चार मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला यावेत, अशी भूमिका शिवसेनच्यावतीने मांडण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी जाहीर केलेली भूमिका महत्वपूर्ण आहे.

वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर व खडकवासला या मतदारसंघासाठी शिवसेनेची तयारी होती. मात्र, युतीत राहून यातील कोणताच मतदारसंघ मिळण्याची शक्‍यता दिसत नाही. त्यामुळे जागा मिळत नसतील तर युतीत लढायचे कशासाठी ही भावना पुण्यातील शिवसेनेत बळावत आहे. खडवासल्यातून रमेश कोंडे, हडपसरमधून माजी आमदार महादेव बाबर तसेच नगरसेवक प्रमोद भानगिरे यांची गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. 

वडगाव शेरीवर शिवसेनेबरोबरच रिपब्लिकन पक्षाचा (आरपीआय) दावा आहे. उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्यासारखा समर्थ पर्याय "आरपीआय'कडे असल्याने वडगाव शेरीबाबत ते आग्रही आहेत. शिवसेनेची मागणी असली तरी युतीत राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो पुण्यातही लागू होईल. त्यामुळे तूर्त तरी भाजपाचे आमदार खूष तर शिवसेनेत अस्वस्थता अशी स्थिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com