वडिलांना वाटत होते मुलाने नगरसेवक व्हावे; अन्‌ मुलगा खासदार झाला  - pune-sanjay-kakade-birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

वडिलांना वाटत होते मुलाने नगरसेवक व्हावे; अन्‌ मुलगा खासदार झाला 

उमेश घोंगडे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वाढदिवसानिमित्त मागे वळून पाहताना खासदार काकडे यांनी गतकाळातील आठवणींना "सरकारनामा"शी बोलताना उजाळा दिला.

पुणे : पुणे महापालिकेच्या शाळेतील एक शिक्षक दत्तात्रय भगवंतराव काकडे. महापालिका शाळेत असल्याने नगरसेवकांचा रूबाब पाहिलेला. त्यामुळे आपल्या मुलाने राजकारणात जावे, नगरसेवक व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा. मात्र नगरसेवक होण्यासारखी परिस्थिती नव्हती. शिक्षक असलेल्या वडिलांच्या या जिद्दी मुलाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले ते नगरसेवक न होता थेट खासदार होऊन. आपल्या मुलाने नगरसेवक व्हावे, असे वाटणाऱ्या शिक्षकाच्या या मुलाने पुणे महापालिकेत स्वत:च्या हिंमतीवर अनेक नगरसेवक निवडून आणले. भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय दत्तात्रय काकडे असे या मुलाचे नाव. 

वाढदिवसानिमित्त मागे वळून पाहताना खासदार काकडे यांनी गतकाळातील आठवणींना "सरकारनामा"शी बोलताना उजाळा दिला. पुरंदर तालुक्‍यातील पांगारे हे खासदार काकडे यांचे मूळ गाव. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीनिमित्त हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. थोरले बंधू सूर्यकांत काकडे यांच्या मदतीने 1986 साली चिंचवडला बांधकामाची पहिली "साईट' सुरू केली आणि बांधकाम व्यवसाय सुरू झाला. व्यवसायाची आवड आणि काहीतरी मोठे करण्याची जिद्द यामुळे 1997 साली पुण्यात सातारा रस्त्यावर धनकवडी येथे "काकडे ज्वेलर्स' नावाने सोन्या-चांदीचे दुकान सुरू केले. व्यवसाय वाढत गेला. मात्र राजकारणात जाण्याची जिद्द मनात कायम होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून लोकसभेची निवडणूक "भाजपा'च्यावतीने लढण्याची तयारी केली. पक्षाकडूनही होकार होता. मात्र काही कारणाने थांबणे भाग पडले. 2009 ची संधी गेल्याने 2012 साली राज्यसभेची संधी साधण्याचा निश्‍चय केला. राज्यातील 52 आमदारांच्या पाठिंब्याने अर्ज भरला. मात्र राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार प्रथमच राज्यसभेवर निवडून जाणार असल्याने माघार घ्यावी लागली. 2014 च्या राज्यसभेसाठी मात्र देशातून बिनविरोध निवडून येणारा राज्यसभेवरील एकमेव खासदार ठरलो. 

2014 लोकसभा निवडणुकानंतर खासदार काकडे पुण्याच्या राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय झाले. विधानसभा निवडणूक तसेच त्यानंतर 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत खासदार काकडे यांची भूमिका महत्वाची ठरली. महापालिका निवडणुकीत "भाजपा'ची सारी सूत्रे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हातात होती. तरी महापालिकेत सत्तेत येण्यास खासदार काकडे यांच्या भूमिकेची "भाजपा'ला मोठी मदत झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख