#FightWithCorona पुण्याचे २२ भाग सील करण्यासाठी पोलिसांना  हवे २ हजारांचे मनुष्यबळ  - Pune Police will need Additional Man Power to Seal Twenty Two New Places | Politics Marathi News - Sarkarnama

#FightWithCorona पुण्याचे २२ भाग सील करण्यासाठी पोलिसांना  हवे २ हजारांचे मनुष्यबळ 

उमेश घोंगडे 
मंगळवार, 14 एप्रिल 2020

नवी २२ ठिकाणे सील करायची झाल्यास त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पोलिसांकडे नाही. पुणे पोलिसांना आणखी सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडॉऊन तीन मे पर्यंत वाढण्यापूर्वीच पुण्यातील आणखी २२ भाग सील करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. चार दिवसांपूर्वी पूर्व भागातील पेठांचा चार पोलीस ठाण्याच्या हद्दतील भाग सील करण्यात आला आहे.

नवी २२ ठिकाणे सील करायची झाल्यास त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पोलिसांकडे नाही. पुणे पोलिसांना आणखी सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे महापालिकेने प्रसतावित केलेले नवे २२ भाग कसे सील करायचे हा प्रश्‍न पोलिसांसमोर उभा आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात पुण्याच्या स्थितीचा आढावा घेतला तेव्हा पुण्यात आणखी दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे पुणे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले होते. गेल्या आठवड्यापेक्षा आज पुण्यात पोलिसांवरील ताण आणखी वाढला आहे. त्यात आणखी २२ भाग सील करायचे झाल्यास लागणारे मनुष्यबळ पोलिसांकडे नाही. 

कोरोनाचे नवे रुग्ण सापडलेल्या भागांचा समावेश

कोरोनाची लागण पुण्यातून झाली. पहिले दोन रूग्ण पुण्यात नऊ मार्चला सापडले. तेव्हापासून पुण्यातील लोक भीतीच्या छायेत आहेत.कोरोनाग्रसतांचा आकडा रोज वाढत आहे. बळींची संख्यादेखील पुण्यात अधिक आहे. या परिस्थितीती दाट लोकवस्ती तसेच झोपडपट्टीच्या भागात कोरोनाचा होण्याची शक्यता लक्षात घेऊन नव्याने २२ भाग निश्‍चित करण्यात आले आहेत. ज्या भागात सध्या कोरोनाचे र्पाझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. त्या ठिकाणांचा समावेश यात करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी घेणार आढावा

राज्यात कोराेनाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यातही पुण्या-मुबंईत रूग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दाट लोकवस्तीच्या भागात रूग्णांची संख्या वाढली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित भाग सील करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनाशी बोलून परिस्थितीची आढावा घेतील. 

त्यानंतर महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष अंमलबजावणी करतील. या सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अपुऱ्या मुनष्यबळाचा यावर काय मार्ग निघतो हे आज-उद्या स्पष्ट होईल. आवश्‍यकतापडली तर होमगार्डची मदत घेण्यात येणार आहे. मात्र, ही मदत किती पुरेशी पडेल याबाबत आधिकाऱ्यांच्या पातळीवर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

ही २२ ठिकाणे करावी लागणार सील

* प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन क्र. १ ते ४८, ताडीवाला रोड प्रभाग क्र. २०
* संपूर्ण ताडीवाला रोड
* घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. २
* राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅँड, संत कबीर, एडी कॅम्प चौक, क्वार्टर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र. २०
* विकासनगर, वानवडी गाव
* लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड
* चिंतामणी नरगर, हांडेवाडी रोड, प्रभाग क्र. २६ व २८
* घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड
* संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. ८
* सय्यदनगर, मह्ममदवाडी हडपसर प्रभाग क्र. २३, २४व २६
* पर्वती दर्शन परिसर
* सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट, पुणे- मुंबर्स रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे डावी बाजू व उजव्या बाजुस नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्व्हे
* संपूर्ण पाटील इस्टेट परिसर
* संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाक क्र. ७
* एनआयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्र. २६
* संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, साईनगर
* वडगाव शेरी परिसर प्रभाग क्र. ५
* धानोरी प्रभाग क्र. १
* येरवडा प्रभाग क्र. ६ आणि  विमानगर प्रभाग क्रमांक 3

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख