संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पावणे तीनशे जणावर पुण्यात पोलिसांची कारवाई  - Pune Police took Action Against Curfew Violators | Politics Marathi News - Sarkarnama

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पावणे तीनशे जणावर पुण्यात पोलिसांची कारवाई 

पांडुरंग सरोदे 
शनिवार, 28 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कलम 144 अन्वये संचारबंदी सुरु असताना त्याचे उल्लंघन करीत शहरार विनाकारण फिरणार्या तब्बल पावणे तीनशेहून अधिक जणावर पोलिसांनी कारवाई केली आहे

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कलम 144 अन्वये संचारबंदी सुरु असताना त्याचे उल्लंघन करीत शहरार विनाकारण फिरणार्या तब्बल पावणे तीनशेहून अधिक जणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वाधिक गुन्हे परीमंडळ दोनमध्ये दाखल झाले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध यापुढेही कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. 

कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भावात वाढ होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार, पोलिसांनी शहरामध्ये संचारबंदी लागू केली आहे.संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता चार पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे.  तसेच शहरात विनाकारण फिरण्यास मनाई आहे. असे असतानाही काही जणाकडुन त्याकडे केले जात आहे. अशा विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांनी १८८ कलमानुसार कारवाई केली आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही संचारबंदी लागू केली असल्याने नागरीकांनी  विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी वारंवार केले जाट होते. तरीही नागरीक त्याकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. तसेच पोलिसांनी वाहने वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही परंतू काहीजण बेजबाबदारपणे बाहेर पडत होते. त्यामुळे पोलिसांनी अशा २७८ जणांवर कारवाई केली आहे. १९ ते २६ मार्च या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर १८८ नुसार कारवाई केली गेली असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अशी असेल शिक्षा

संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिस कलम १८८ नुसार कारवाई करून त्याचा खटला न्यायालयात दाखल करतात. यानंतर न्यायालय संबधित नागरिकाची जास्तीत जास्त सहा महिने कारागृहात रवानगी करू शकते, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख