Pune police takes action against rupali patil | Sarkarnama

मनसेच्या महिला शहराध्यक्षा रूपाली पाटील यांना विसर्जन मिरवणुकीत प्रवेशबंदी

सागर आव्हाड
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुणे : मनसेच्या पुणे शहर महिलाध्यक्षा रूपाली ठोंबरे पाटील यांना पुणे पोलिसांना गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास प्रतिबंध केला आहे. रूपाली पाटील या सहभागी झाल्या तर लोकांच्या जिविताला धोका निर्माण होईल म्हणून त्यांना 11  ते 13 सप्टेंबरपर्यंत पुणे पोलिसांच्या परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास व वास्तव्यास मनाई करण्यात आली आहे.

परिमंडळ एकच्या उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी हा आदेश बजावला आहे. पाटील यांच्यावर खडक, बिबवेवाडी यासह इतर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्याचा हवाला या आदेशामध्ये देण्यात आला आहे. पुण्याची मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक ही परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातून निघते. तेथेच पाटील यांना येण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांना मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही.

डीजेवरील बंधनासाठी पुणे पोलिस आग्रही आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही त्यास पाठिंबा दिला होता. त्यावरून रूपाली पाटील यांनी टीका केली होती. तसेच पालकमंत्र्यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद घ्यावे म्हणजे त्यांना कार्यकर्त्यांच्या अडचणी समजतील, असा टोला लगावला होता. या राजकीय कारणांमुळे आपल्यावर कारवाई केल्याचा आरोप रूपाली पाटील यांनी केला आहे. सरकारची ही दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख