पुण्याच्या नगरसेवकाला पेट्रोल नाकारले; पण त्याने पोलिसाचे कौतुक केले

राजकीय नेते अनेकदा आडमुठेपणा दाखवतात. संचारबंदीच्या काळात सामान्य नागरिकही पोलिसांशी हुज्जत घालतात.त्या पार्श्वभूमीवर या नगरसेवकाचे कौतुकच करायला हवे.
bahiyasaheb jadhav pmc
bahiyasaheb jadhav pmc

पुणे : नगरसेवकांना किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांना संचारबंदीच्या काळात अनेकदा मदतीसाठी जावे लागेत. मात्र पुणे पोलिसांच्या एका फतव्यामुळे नगरसेवकालाही आपल्या दुचाकीसाठी पेट्रोल मिळाले नसल्याची परिस्थिती आज उद्भवली. हा नगरसेवक उच्चशिक्षित असल्याने त्याने पोलिसांशी वाद न घातला उलट त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि पंपावरून आपली गाडी मागे वळवली.

पुणे शहरात 'लॉकडाऊन' असूनही नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी गल्लीबोळात वाहनांवरून फिरत असल्याची बाब पुणे पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. ही मंडळी लोकांच्या मदतीला धाऊन जात असली तरी, गर्दी होत असल्याने नगरसेवकांना इंधन न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. परंतु, कामाचे स्वरूप आणि त्याचा परिणाम स्पष्टपणे सांगितल्यास नगरसेवकांना पेट्रोल मिळेल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी स्पष्ट केले..

नगरसेवकांना पेट्रोल पंपांवर प्रवेश देऊन, त्यांना पेट्रोल देण्याबाबत पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याशी चर्चा झाली आहे. सरसकट नगरसेवकांना पेट्रोल देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण कामानुसार ते दिलेही जात आहे. पुढच्या काळात गरज लक्षात घेऊन नगरसेवकांना पास पुरविण्याचा विचार होऊ शकतो. त्याबाबत पोलिसांशी पुन्हा चर्चा केली जाईल, हेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

खराडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांना रविवारी पेट्रोल पंपावर जाण्यापासून पेट्रोल देण्यासही पोलिसांनी नकार दिला. 'प्रभागातील लोकांच्या मदतीला जावे लागते आहे, त्यामुळे पेट्रोल देण्याची विनंती जाधव यांनी केली. त्यानंतरही पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे नगरसेवक जाधव यांनी पेट्रोल न भरतातच आपली दुचाकी मागे घेतली. भैय्यासाहेब हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली केलेले आहेत. तसेच जेएमएफसी म्हणून न्यायधीशाचेही काम त्यांनी पाहिलेले होते. त्यामुळे त्यांनी समंजसपणे पोलिसांचा निर्णय समजावून घेत त्या पोलिसाचे कौतुकही केले.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक आपापल्या प्रभागांतील लोकांना काही प्रमाणात अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. त्यामुळे पेट्रोल देण्याचा नगरसेवकांचा आग्रह आहे. मात्र, सरसकट नगरसेवकांना पेट्रोल देता येणार नाही, असे पोलिसांनी महापालिका प्रशासनाला आधीच कळविले आहे. त्यावर गायकवाड यांनीही आपली बाजू मांडली.

गायकवाड म्हणाले, "नगरसेवक प्रभागातील लोकांना मदत करीत आहेत. पण तिथे गर्दीही होत आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल देता येणार नाही, हेही पोलिसांनी कळविले आहे. त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा योग्य नाही. मात्र काही कामांसाठी निश्चितपणाने नगरसेवकांना पेट्रोल मिळाले पाहिजे. तसे काम सांगितल्यानंतर पोलिसही अडविणार नाहीत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com