...काय पुणेकर? स्वीकारणार पोलिसांचे 'हे' आव्हान! - Pune Police Gives Challenge To Those Who Want to Come on Road In Lock Down | Politics Marathi News - Sarkarnama

...काय पुणेकर? स्वीकारणार पोलिसांचे 'हे' आव्हान!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 एप्रिल 2020

शहर कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनले आहे. अजून काही दिवस लाॅकडाऊन मध्ये सूट मिळण्याची शक्यता नाही. तरीही अनेक जण घराबाहेर फिरत आहेत. नाकाबंदीवरील पोलिसांना वाटेल ती कारणे सांगत आहेत. अशा 'फिरस्त्यां'ना पुणे पोलिसांनी एक आव्हान दिले आहे

पुणे : शहर कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनले आहे. अजून काही दिवस लाॅकडाऊन मध्ये सूट मिळण्याची शक्यता नाही. तरीही अनेक जण घराबाहेर फिरत आहेत. नाकाबंदीवरील पोलिसांना वाटेल ती कारणे सांगत आहेत. अशा 'फिरस्त्यां'ना पुणे पोलिसांनी ट्वीटरवरुन एक आव्हान दिले आहे. 

ज्यांच्याकडे कोणताही पास नाही  किंवा कोणतीही गरज नसताना 
बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा!

पण आमची एक अट आहे. 
आधी ६ तास  कोरोना संसर्ग झालेल्या "रेड झोन" मध्ये पोलीसांसोबत ड्युटी करून दाखवावी.
बोला मंजूर ?.....

हे पोलिसांचे आव्हान आहे. बोला पुणेकर आहे मंजूर. फिरा वाटेल तेवढे. पण पोलिस सांगतात त्या प्रमाणे सहा तास कोरोना संसर्गाच्या भागात ड्युटी करून!

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. 

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून  केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यांची गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये ,यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत, असे निर्देश त्यांनी दिले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख