पत्नीने बारामतीतून लोकसभा निवडणूक का लढविली, याचे राहुल कुल यांनी सांगितले हे कारण! - Why my wife contested loksabha election from Baramati answres MLA Kul | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

पत्नीने बारामतीतून लोकसभा निवडणूक का लढविली, याचे राहुल कुल यांनी सांगितले हे कारण!

दत्ता जाधव
शनिवार, 31 जुलै 2021

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची निवडणूक चर्चेत आली होती. 

माळशिरस : बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची उमेदवारी स्वीकारताना वरिष्ठांकडे कुठल्याही पदांची मागणी केली नव्हती. तर  मुळशी प्रकल्पातील पाणी जिल्ह्यातील या भागात आणण्यासाठी ची मागणी केली होती. याच मुळशी प्रकल्पाच्या मागणी वरती लोकसभेची उमेदवारी आपल्या सौभाग्यवतीने स्वीकारले होती, असा दावा दौंडचे आमदार आमदार राहुल कुल यांनी केला. 

राहुल यांच्या पत्नी कांचन यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. पवार कुटुंबियांच्या जवळ असतानाही कुल कुटुंबाने हा निर्णय का घेतला, याची तेव्हा चर्चा होती. त्यावर आता कुल यांनी हे उत्तर दिले. या निवडणुकीत सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. तसेच कुल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी आघाडी घेतली होती. 

वाचा ही बातमी : महाराष्ट्रात निवडणूक झाल्यास फडणवीसच भाजपचा चेहरा

भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून अटल आरोग्य रथ या उपक्रमाचा शुभारंभ दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज माळशिरस येथे पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माळशिरसचे माजी सरपंच अरुण यादव, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळ तात्या यादव, उपसरपंच गोकुळ यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, आदिनाथ यादव उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल कुल म्हणाले की, या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी पुरंदर उपसा व  जानाई शिरसाई या योजनांनी मोठा  हातभार लावला आहे. दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांसह विदर्भ व मराठवाड्यातील भागाला योगदान ठरू शकेल अशा मुळशी प्रकल्पातील पाणी या  भागात आणण्यासाठी आग्रही मागणी केली होती. पत्नीने भाजपकडून लोकसभेची उमेदवारी स्वीकारताना देखील मी पक्षश्रेष्ठींकडे मला स्वतःला कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मुळशी प्रकल्पातील पाणी या भागात आले पाहिजे, ही एकमेव मागणीच मी केली होती. या मागणीवरच माझ्या सौभाग्यवतीने लोकसभेची उमेदवारी स्वीकारली.

वाचा ही बातमी : माझे मंत्रीपद का गेले, याचे उत्तर मिळाले तर शांती मिळेल...

मुळशी प्रकल्पातील पाणी या भागात आणण्या बाबतचा अभ्यास करण्यासाठी तीन आमदार व इतर तज्ज्ञ लोकांच्या समावेश असलेली भावे व सुर्वे अशी दोन समित्या स्थापन केल्या. या समित्या लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करतील असे त्यांनी  सांगितले. या प्रकल्पाच्या उपलब्धतेबाबत सर्वपक्षीय एकमत सुरुवातीला होऊ शकले नाही. मात्र आता हे सर्वपक्षीय एकमत करण्यात यश आले असे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख