ऑक्सिजननंतर रेडमिसिविरसाठी गूड न्यूज : राज्याला रोज 27 हजार ऐवजी 43 हजार इंजेक्शन मिळणार - Union govt hikes remdesiver supply for Maharashtra by 0ne lakh 65 thousands | Politics Marathi News - Sarkarnama

ऑक्सिजननंतर रेडमिसिविरसाठी गूड न्यूज : राज्याला रोज 27 हजार ऐवजी 43 हजार इंजेक्शन मिळणार

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

या इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद झाला होता. 

मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार रेमडिसिविर व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश आज जारी केला. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे. महाराष्ट्राल रोज सरासरी सुमारे 50 हजार इंजेक्शनची आवश्यकता असते. त्या प्रमााणात हा पुरवठा असल्याचे दिसून येत आहे. रेमडिसिवरच्या वापरावरही सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून असल्याने त्याचा सरसकट वापर टाळण्यात थोडेफार यश मिळून येत आहे. त्यामुळे हा पुरवठा पुरेसा ठरण्याची चिन्हे आहेत.

गुजरातला त्या खालोखाल 1 लाख 65 हजार आणि उत्तर प्रदेशला 1 लाख 61 हजार इंजेक्शन हे 21 ते 30 एप्रिल या दरम्यान मिळणार आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेम्डीसीव्हीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.  राज्यात रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती.

दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मोदी यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचे सर्वाधिक वितरण झाले आहे. नव्याने वितरण जाहीर झालेल्या 5 लाखांपैकी महाराष्ट्राला 1,65,800 अर्थात 34 टक्के इंजेक्शन मिळणार आहेत. आतापर्यंतच्या एकूण 16 लाख रेमडेसिवीरपैकी 4,35,000 आणि तेही केवळ 10 दिवसांसाठी!, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. 

ऑक्सिजन एक्स्प्रेसचे दोन टँकर अहमदनगर मध्ये दाखल झाले असून पैकी एक अहमदनगर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी १९ एप्रिलला कळंबोलाहून विशाखापट्टणम येथे पाठविलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस  आज  नाशिकला पोहोचली. या गाडीत सात टँकर होते  त्यातील तीन नागपूरला उतरवून चार टँकरपैकी दोन नाशिकला, तर दोन नगरला पाठविले आहे.  आज 7.30 च्या दरम्यान एक टँकर नगर च्या शासकीय रुग्णालयात पोहोचला आणि शासकीय रुग्णालय येथील टाकीत तो रिकामी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या ऑक्सिजन मुळे काही प्रमाणात का होईना  रुग्णांना दिलासा मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख