आमदार अनिल भोसले यांच्या फार्महाऊसवर चोरट्यांचा डल्ला

भोसले हे गेल्या वर्षभरापासून येरवडा तुरुंगात आहेत.
 आमदार अनिल भोसले यांच्या फार्महाऊसवर चोरट्यांचा डल्ला
anil bhosale.jpg

लोणी काळभोर (पुणे) :  शिवाजीराव भोसले सहकारी बॅकेतील गैरव्यवहार प्रकरणी गेल्या वर्षभरापासून येरवडा तुरुंगात असलेले विधान परीषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील फार्म हाऊसवर रविवारी (ता. ३०) मध्यरात्री चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

भोसले यांच्या येथील घरातुन दोन एलसीडी टिव्ही, होम थिएटर, दुध पॅकिंग करण्याची मशीन, लस्सी बनविण्याची मशीन असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी व्यवस्थापक महादेव जनार्दन खंडागळे (वय ४८, रा. कोरेगांवमुळ ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव मुळ हद्दीत  भोसले यांच्या मालकिचा शिवाई ऑरगॅनिक फार्म या नावाने फार्महाऊस आहे. या ठिकाणी तूप, लोणी, पनीर, लस्सी, खवा असे दुधापासुन पदार्थ बनविण्याचे काम चालू काम चालु असते. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या कथीत गैरव्यवहारात आमदार अनिल भोसले तुरुंगात असले तरी, या फार्मचे व्यवस्थापन महादेव खंडागळे पहातात. महादेव खंडागळे रविवारी (ता. ३०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गणपतीची आरती उरकुन गेले होते. ते आज (सोमवारी) सकाळी सातच्या सुमारास पुन्हा फार्म हाऊसवर आले असता, बंगल्याचा मुख्य दरवाज्याचा कोयंडा तुटलेला दिसला. बारकाईने बंगल्याची पाहणी केली असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी करत आहेत

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in