रवींद्र बऱ्हाटेचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

अनेक प्रकरणांत तो पोलिसांना हवा होता...
ravindra-barhate-ff.jpg
ravindra-barhate-ff.jpg

पुणे : पोलिसांना अनेक प्रकरणात हवा असलेला तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याचा जामीन अखेर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून त्याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी सतत प्रयत्न करणाऱ्या पोलिस यंत्रणेनीही सुस्करा सोडला आहे. यापूर्वी सत्र आणि उच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज नामंजूर केला होता.

बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि जागा नावावर करून देण्याची मागणी केल्याप्रकरणात हा अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता. न्यायामूर्ती अशोक भूषण, न्यायाधीश सुभाष रेड्डी आणि न्यायाधीश एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

बऱ्हाटे याने या गुन्ह्याचा कट रचल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. या प्रकरणात बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप (वय 49, रा.भवानी पेठ), पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (वय 52, रा. प्रियदर्शन सोसा.सिंहगड रोड), दीप्ती आहेर (वय 34,, रा. बावधन) आणि अमोल सतीश चव्हाण (चव्हाणवाडा, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. बऱ्हाटे याचा एफआयआरमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे सांगत बचाव पक्षाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास पोलिसांनी सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोध केला होता.

बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांवर सुरवातीला कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बऱ्हाटेसह इतरांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांपासून बचाव करीत फिरणा-या बऱ्हाटे याने ओळखीच्या व्यक्तीची दुचाकी चोरल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे.

अटकेचा कायदेशीर मार्ग मोकळा

गुन्हा दाखल झाल्यापासून बऱ्हाटे फरार आहे. पोलिस गेली अनेक दिवस त्याचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो मिळून आलेला नाही. त्याला फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील जामीन फेटाळल्याने बऱ्हाटेला अटक करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com