खून झालेल्या गोल्डमन फुगेच्या मुलाला खूनाच्या गुन्ह्यातच अटक

भाईला का मारले म्हणून केला खून...
phuge goldman
phuge goldman

पिंपरी : राज्यात गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला आणि खून झालेला भोसरीतील दत्ता फुगे याचा मुलगा शुभम याला खूनाच्याच गुन्ह्यात भोसरी पोलिसांनी अटक केली. तो ही मिनी गोल्डमॅन म्हणून मिरवत होता. तीन किलोंचा दीड कोटी रुपयांचा सोन्याचा शर्ट घालून दत्ता फुगे जगभर प्रसिद्ध झाला होता.

सीसीटीव्ही फूटेज वा इतर कसलाही पुरावा नसताना फक्त खूनाच्या निर्घूण पद्धतीवरून हे कृत्य सराईत गुन्हेगाराचे असल्याचा निष्कर्ष काढून काही तासात हा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन भोसरी पोलिसांचे कौतूक केले.

चिटफंड आणि जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात असलेल्या दत्ता फुगेचा 15 जुलै 2016 रोजी अपहरण करून निर्घूण खून करण्यात आला होता. आर्थिक व्यवसाहातून त्याला दगडांनी ठेचून मारण्यात आले होते. ज्या महिन्यात त्याला मारण्यात आले,त्याच महिन्यात त्याच्या मुलाला खूनाच्याच गुन्ह्यात अटक झाली आहे. त्यानेही वडिलांचा जसा निर्घूण खून झाला, तसाच आपल्याच मित्राचा ओळख पटणार नाही,असा चेहरा विद्रूप करून धारदार हत्याराने आज पहाटे खून केला होता.

या गुन्ह्यात शुभम व त्याचा साथीदार प्रथमेश वायकर याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी अमन सुरेश डांगळे (वय 27, रा. भोसरी) या आपल्या मित्राचा दारुच्या नशेत सोमवारी रात्री खून केला होता. त्यात त्यांचा एक अल्पवयीन मित्रही सहभागी आहे. शुभम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध याअगोदर तीन गुन्हे भोसरी पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

शुभम व त्याचे दोन साथीदार आरोपी व मयत अमन हे मित्र असून त्यांनी सोमवारी रात्री शुभमच्या गच्चीवर दारुची पार्टी केली. त्यावेळी शुभम व अमनमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन अमनने शुभमच्या कानफटात लगावली. त्यावर तू आमच्या भाईला का मारले अशी विचारणा शुभमच्या मित्रांनी केली. नंतर शुभमने प्रथम अमनच्या डोक्यावर मागून कोयत्याने वार केला. नंतर त्याच कोयत्याने इतर दोघांनीही त्याच्या डोक्यात घाव घातले होते.त्याच्याकडील ओळखपत्र काढून घेऊन ते पसार झाले होते. सकाळी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी लागलीच दोन पथके तयार करून तपासाला सुरवात केली. खून ज्या पद्धतीने झाला,त्यावरून हे सराईत गुन्हेगारांचे कृत्य असल्याची शक्यता विचारात घेऊन त्यांनी सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरु केली. त्यावेळी शुभम हा पलायनाच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेऊन आपल्या पद्धतीने चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com