दत्ता साने यांच्या मृत्यू कोरोनाने नाही घातपाताने : कुटुंबियांनी शरद पवार यांच्याकडे मांडली व्यथा

कोरोनाचा पिंपरी-चिंचवडमध्ये प्रादुर्भाव वाढतच आहे...
दत्ता साने यांच्या मृत्यू कोरोनाने नाही घातपाताने : कुटुंबियांनी शरद पवार यांच्याकडे मांडली व्यथा
pawar-meets-family-of-sane

पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक नेते, पदाधिकारी घराबाहेर पडत नाहीत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत. आज त्यांनी पिंपरी -चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. साने यांचे नुकतेच 4 जुलै रोजी निधन झाले होते.

साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले होते. स्थानिक राजकारणात ते सक्रिय होते. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दत्ता साने यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच साने यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. साने हे राष्ट्रवादी चे कट्टर कार्यकर्ते होते. शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने सात दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी पवार यांच्याकडे केली.

नगरसेवक साने यांच्या पत्नीने ‘दत्ता साने यांचा मृत्यू कोरोनांमुळे नव्हे तर संशयास्पद मृत्यू झाला’ असे शरद पवार यांना सांगत याची चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. तर शरद पवार यांनी या प्रकरणाची करण्यात येईल, असे यावेळी आश्वासन दिले.

राज्यात कोरोनाचा कहर

राज्यात कोव्हिड-19 प्रादुर्भावाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता. 6 जुलै) दिवसभरात 5368 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाख 11 हजार 987 झाली आहे. आणखी 204 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9026 वर पोचला आहे. राज्यात एकूण 86,040 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी राज्यात एकूण 204 कोरोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत 39, ठाणे जिल्ह्यात 75, पुणे मंडळात 28, औरंगाबाद मंडळात 12, नाशिक मंडळात 39, कोल्हापूर मंडळात दोन, लातूर मंडळात चार, अकोला मंडळात चार, नागपूर मंडळात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के आहे. आतापर्यंत 11 लाख 35 हजार 447 रुग्णांच्या नमुन्यांपैकी दोन लाख 11 हजार 987 म्हणजे 18.67 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख 15 हजार 265 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि 46 हजार 355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in