रमेश बागवे पुन्हा शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष; पुण्यातील सात जण प्रदेश कार्यकारीणीत

जुन्या नेत्यांना पुन्हा संधी...
रमेश बागवे पुन्हा शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष; पुण्यातील सात जण प्रदेश कार्यकारीणीत
Ramesh Bagwe

पुणे : पुणे शहर काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांना कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आता थांबली आहे. बागवे यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष आता निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. रात्री उशिरा प्रदेश कार्यकारिणीची जाहीर झाली. पिंपरी-चिंचवडसाठी मात्र पक्षाला चेहरा मिळू शकला नाही.  (Ramesh Bagwe reappointed as Punc city congress president) 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जाहीर केलेल्या कार्यकारिणीत पुण्यातील सात जणांना स्थान मिळाले आहे. यात कार्यकारी समितीत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची तर सरचिटणीसपदी अभय छाजेड, रोहित टिळक आणि वीरेंद्र किराड यांची नियुक्ती झाली आहे. गोपाळ तिवारी आणि दीप्ती चवधरी यांची चिटणीस म्हणून संधी मिळाली आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड झाली आहे. 

या नव्या कार्यकारिणीत 18 उपाध्यक्ष, एक खजिनदार,  65 सरचिटणीस आणि 104 चिटणीस, सहा प्रवक्ते आहेत. या कार्यकारिणीत महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप ह्या सर्वात तरुण आहेत. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रदेश कार्यकारिणीची राज्यातील नेतेमंडळींपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना प्रतीक्षा होती. तब्बल पाच महिन्यांनंतर पटोले यांची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्हा काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील तर सांगलीच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची नियुक्ती झाली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in